दिलीप चौधरी (वय 32, रा. कोथरूड ) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरूड भागात दिलीप यांचे तुलसी सुपर शॉपी हे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. रात्री नऊच्या सुमारास दिलीप दुकानात होते.
त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. फिर्यादींनी नकार दिल्यानंतर आरोपींनी गल्ल्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी फिर्यांदींनी आरोपींना विरोध केला असता त्यांच्यावर आरोपीने चाकूने वार केले.
दुकानातील स्कॅनिंग यंत्र चोरून चोरटे पसार झाले. कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



