पंढरपूर, दि.23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ
गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वाजता रेल्वे मैदान, पंढरपूर येथे होणार आहे.
उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून,
या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी
यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे असे, आवाहन तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.



