कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या दिंडीत जुनोनी (सांगोला) येथे भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातातील जठारवाडी (ता.
करवीर) येथील गंभीर जखमी झालेल्या शालन विलास शियेकर-पाटील (वय ४५) यांचा आज (दि.२३) दुपारी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातील मृतांची संख्या ९ झाली आहे.
या अपघातात यापूर्वी सर्जेराव जाधव, शांताबाई जाधव, रंजना जाधव, सुनिता काटे, शारदा घोडके (सर्व रा. जठारवाडी) आणि सुशीला पोवार व गौरव पोवार (रा. वळिवडे) अशा सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, या अपघातातील गंभीर जखमी अनुसया शियेकर-पाटील यांचा गेल्या महिन्यात उपचारावेळीच मृत्यू झाला तर आज त्यांच्याच जाऊबाई शालन शियेकर-पाटील यांचा मृत्यू झाला. जखमी शालन यांच्यावर अपघातानंतर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
३ आठवड्यापूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना घरी न आणता सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.



