पंढरपूर तालुक्यातील खर्डीच्या सीताराम महाराज यांचा भंडारा 16 नोहेंबर रोजी
श्री सीताराम महाराज समाधी मंदिर खर्डी (छाया अमोल कुलकर्णी)
पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017
सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली.दिनांक 10 रोजी मानाप्रमाणे सप्ताहाचे सात दिवस सुरू झाले .केसकर (कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडा भर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचेकडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगती चे आयोजन केले आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष रामचंद्र रोंगे,सचिव गंगाधर केसकर,विकास कुलकर्णी,उमेशराव परिचारक आदी उपस्थित होते.
भंडारा हा मुख्य उत्सव
दिनांक 16 रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला श्रींच्या समाधीवर दुपारी 12 वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.
राज्याबरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.अनेक मनोरुग्ण व बाधित लोक बरे झाल्याने यात्रा मोठ्या प्रमाणत भरते.दरवर्षी यात्रा काळात नारळ खेळणी प्रासादिक दुकाने यांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.
अमावस्या हाही मासिक यात्रेचा भाग असल्याने त्यानंतर पायी पालखीचे गाणगापूर कडे प्रस्थान होते.यात्रेची सांगता होते.
या यात्रा कालावधी साठी ग्रामपंचायत खर्डी च्या वतीने सर्व तयारी स्वछता ,पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग सज्ज असल्याची माहिती सरपंच रमेश हाके यांनी दिली .यात्रा कालावधीत वाहन गावात येऊ न देता बाहेरून जाण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.याकरिता उपसरपंच प्रणव परिचारक व सर्व सदस्यांबरोबर ग्रामसेवक तानाजी मकर ,बंडूलाल पठाण ,पोपट कावरे,प्रभू गायकवाड, आदी परिश्रम घेत आहेत.
आवाहन
पंढरपूर खर्डी सांगोला मार्गवरील मुख्य रस्तावरील खड्डे यात्रे पूर्वी बुजवून घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थ तसेच भविकातून होत आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर