👁 10 Views

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे


पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017

राज्यभरात पोलिसांचे विविध कारनामे आता समोर येत आहेत. गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 18 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


सांगली पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून अनिकेत कोथळेची हत्या केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालं आहे. यात पोलीस उपनिरीक्षकासह, ठाणे अंमलदार आणि त्याचा मदतनीसाचाही समावेश आहे.तर वसईमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाला संशयाचं वलय निर्माण झालं असून पालघर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.


दुसरीकडे हिंगोलीत बनावट नोटाप्रकरणी दोन पोलिसांना अटक कऱण्यात आली आहे. याशिवाय, पुणे पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांवर हत्येचा कट आखल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे.पोलिसांच्या या कारनाम्यांमुळे पोलिस दलाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *