पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017
परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू
सोलापूर दि. 21 :- महराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात येणारी डी.टी.एड व डी.एल.डी. परीक्षा दिनांक 21 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत घेण्यात येत आहे. सोलापूर शहरात या परीक्षेचे केंद्र एस.व्ही.सी.एस अध्यापक विद्यालय, एमआयडीसी रोड, सोलापूर येथे आहे.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पायबंध करणे, परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इमेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा भ्रमणध्वनी (MOBILE), संगणक, गणनायंत्र (CALCULATOR) व अशा इतर प्रकारच्या स्वरूपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये आणि सर्व संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे आणि कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार एस.व्ही.सी.एस. अध्यापक विद्यालय, एमआयडीसी रोड, सोलापूर या परीक्षा केंद्राचे 100 मीटरच्या परिसरात खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती कडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एस.टी.डी बुथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे इत्यादी माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ईमेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले मख्याध्यापक / कर्मचारी , शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / शिक्षक / कर्मचारी आणि उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना ( उमेदवारांच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे आवारात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबंधीत अधिकारी / कर्मचारी , परीक्षार्थी सोडून कोणालाही प्रवेश असणार नाही.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी , परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचेबाबत त्यांचे परीक्षेसबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. तथापि भ्रमणध्वनीचा वापर केवळ केंद्र संचालक आणि दक्षता / बैठे पथक यांनाच करता येईल इतर सर्वांना भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असेल. या आदेशाचा अवमान केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असेही पोलीस उपायुक्त श्रीमती चौगुले – श्रींगी यांनी आदेशात नमूद केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



