पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017
वैज्ञानिक उपकरणे मिळाल्यास जिल्हा प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन
सोलापूर दि. 21 :- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमार्फत अणुऊर्जा विभाग व भारतीय अवकाश संशोधन विभागाच्या सहकार्याने 15 नोव्हेंबर 2017 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत हैद्राबाद येथून 10 बलून फ्लाईट अवकाशात सोडण्यात येणार आहेत. सदर बलून फ्लाईटमध्ये संशोशनाकरिता आवश्यक वैज्ञानिक उपकरणे असून बलून फ्लाईट 30 ते 42 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर त्यातील वैज्ञानिक उपकरणे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर येणार आहेत.
पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर येणारी उपकरणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडण्याची शक्यता आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडल्यास नागरीकांनी घाबरुन जावू नये. जमिनीवर पडलेल्या उपकरणाशी कोणतीही छेडछाड न करता याबाबतची माहिती त्वरीत जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनास द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




