👁 6 Views

कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांची 94 वी जयंती… गरीब रूग्णांसाठी विठ्ठल हॉस्पिटल संजिवनी ठरत आहे- आ. भारत भालके

पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017

पंढरपूर, प्रतिनिधी
सामान्य कुटूंबातील रूग्णांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर औदुंबरआण्णा  पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटल उभे केले आणि आज सर्व प्रकारच्या अद्यावत मशनरी उपलब्ध करून जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने रूग्णांना सेवा देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करीत असल्याने एक प्रकारे गरीब रूग्णांसाठी विठ्ठल हॉस्पिटल संजिवनी ठरत असल्याचे प्रतिपादन आ. भारत भालके यांनी केले. ते कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, सह. शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, दिनकर पाटील, नारायण जाधव, दिनकर चव्हाण, दिनकर कदम, रामहरी रणदिवे, चंदुलाल शहा, विलासराव साळुंखे, शांतिनाथ बागल, पंढरी-भूषणचे संस्थापक शिवाजी शिंदे सर, मर्चन्ट बँकेचे चेअरमन  नागेश भोसले, रा. काँ. शहराध्यक्ष सुधीर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मा. आ. दिपकआबा साळुंखे यांच्या हस्ते कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच श्री विठ्ठल हॉस्पिटल मध्ये नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या 2-डीइको या विभागाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मोफत नेत्र तपासणी व मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी आ. भारत भालके पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात डेंग्यु, चिकुनगुनिया, व्हायरल इनफेक्शनच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त असून अशा रूग्णावर चांगल्या प्रकारे सेवा देत उपचार करून रूग्ण पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडावा अशी अपेक्षा व्यक्त करीत शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून शासकीय योजना विठ्ठल हॉस्पिटलमध्ये कार्यान्वयीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत कर्मवीर आण्णांनी अनेक संस्था उभ्या करून चांगल्या पध्दतीने काटकसरीने चालवित राज्यात एक आदर्श निर्माण केला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवराज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी चांगल्या पध्दतीने हॉस्पिटल चालवावे अशी अपेक्षा व्यक्त करीत कर्मवीर आण्णांना अभिवादन केले.
प्रारंभी आपल्या स्वागत: व प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी हॉस्पिटल सुरू करताना अलेल्या अडचणींना सामोरे जात सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढीत हॉस्पिटल अद्यावत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत हॉस्पिटलमध्ये आयसीयु, डायलेसिस, स्त्रीरोग विभाग, अपघात विभाग, आजपासून सुरू होत असलेल्या 2-डीईको विभाग, 24 तास सेवा देण्यासाठी कार्यारत असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्मवीर आण्णांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
 याप्रसंगी अभिजीत पाटील, अ‍ॅड. आनंतराव पाटील, शरद चव्हाण, रणजित पाटील, जिवराज चव्हाण, अ‍ॅड. भारत भोसले, हरिदादा घाडगे, लायन्स क्लबचे रा.पा. कटेकर, दिपक वाडदेकर, नगरसेवक महादेव भालेराव, बंदपट्टे, प्रशांत शिंदे, महादेव मस्के, महादेव खटके, मारूती जाधव, विलास देठे, संजयआप्पा भिंगे, लक्ष्मण वाघमोडे, संजय पाटील, डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ. बी.जी. लाड, डॉ. प्रमोद अभिवंत, मल्हारी पवार, रविंद्र पाटील, भारत शितोळे, मोहन पाटील, राजू उराडे व आण्णा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागटिळक सर व बोंगाळे सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रविण भोसले यांनी मानले.

सध्याच्या काळात सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आता इतिहास जमा होऊ लागल्याची खंत व्यक्त करीत सध्या फक्त व्यवसाय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मल्टिस्पेशालीस्ट हॉस्पिटल स्पर्धा सुरू झाली. अशा परिस्थितीत सामान्य रूग्णांना अशा हॉस्पिटलमधून उपचार घेणे परवडत नाही. त्यावेळी विठ्ठल हॉस्पिटल सारख्या ट्रस्टची गरज ही गोर गरीबांना पडते. विठ्ठल हॉस्पिटलमधून गोरगरीब व सामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे व कमी खर्चात उपचार करीत सेवा देण्याचे सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चांगल्या कामाला अनेक अडचणी येत असतात. त्यातून मार्ग काढीत चांगल्या पध्दतीने हॉस्पिटल चालवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.- मा. आ. दिपकआबा साळुंखे


सध्याच्या काळात अनेक संस्था उपाचारासाठी मदत करीत असतात. असे असले तरीही ती मदत अपुरीच पडत असल्याचे सांगतले. अशा वेळी गरजू व गरीब रूग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून कमी खर्चात चांगले उपचार मिळावे म्हणून कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटलची उभारणी केली आणि आज युवराज पाटील व त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे सामान्य रूग्णांना उपचार करीत सेवा देत असल्याचे समाधान व्यक्त केली. -बळीराम काका साठे


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *