👁 6 Views

ई – स्कॉलरशिप संकेतस्थळ मर्यादीत काळासाठी सुरू

पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 23 : –  मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृती / शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-2018 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा –डीबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे http://mahaeschol.maharashtra.gov.in संकेतस्थळ संस्थागित करण्यात आलेले होते. काही विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्ती /शिक्षण फी ,परिक्षा फी/ विद्यावेतने /निर्वाह भत्ता इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो आदा करण्यासाठी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळ 21.11.2017 पासून पुन्हा मर्यादीत कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

 प्रथम टप्यामध्ये ज्या विदयार्थ्यानी सन 2015-2016 साठी दिनांक 31. 3.2016 साठी 2016-2017 करीता दिनांक 31. 3.2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतू ज्यांना अदयाप शिष्यवृत्ती, शिक्षण फी चा लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्याचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी या संकंतस्थळावरुन 21.11.2017 ते 31 .11.2017 पर्यंत संबधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत.
 तेव्हा शाळा/ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे  ऑनलाइन  सादर केलेले 2015-2016व 2016-2017 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरेने सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *