👁 8 Views

सहकार महर्षीचे साहित्य पुरस्कार जाहीर*

सहकार महर्षीचे साहित्य पुरस्कार जाहीर



पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017

 डॉ. राजाराम राठोड, श्रीकृष्ण जगदाळे, संभाजी आडगळे, सुनीता काटम व शिल्पा सावंत यावर्षीच्या मानकरी

प्रतिनिधी/पंढरपूर
   सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रांझणी व श्री जय भवानी भक्तजन व सांस्कृतिक कालामंडळ रांझणी यांच्या वतीने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीचे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता.भोसले यांच्या शुभहस्ते व आमदार दत्तात्रय सावंत व आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रांझणी येथे सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती पुरस्कार  समितीचे अध्यक्ष व संयोजक प्रवीण भाकरे यांनी दिले आहे.
     सदर पुरस्कार हे डॉ. राजाराम राठोड (कविता इंद्रजित भालेरावांची) श्रीकृष्ण जगदाळे (छळछावणी) संभाजी अडगळे (वेदनांचा वेध) सौ सुनीता काटम ( डायरीची पाने)  सौ.शिल्पा सावंत (अनटच कोपरा) मीनल येवले (आंदण) यांना जाहीर झाले आहेत. पुस्तक परीक्षण समितीमध्ये कवी हरिश्चंद्र पाटील, लेखक अंकुश गाजरे, प्रवीण भाकरे,व कवी गणेश गायकवाड यांनी काम पाहिले.या कार्यक्रमात अरुण कटारे, सुनील जवंजाळ, हरिश्चंद्र पाटील, मयुरी जाधव, अविनाश सुर्वे, गणेश गायकवाड यांचे बहारदार कविसंमेलन होणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश शिंदे, जय भवानी मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव घाडगे यांनी केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *