पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 27 :- सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील टोल नाक्यावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व संबंधित यंत्रणेने आवश्यक दक्षता घ्यावी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या
सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर जिल्हा हद्दीतील टोल नाक्यावर होत असलेल्या विलंबाबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व सर्व संबंधितांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, टोल नाक्यावर वाहतूक सुरळीत रहावी, टोल भरण्यासाठी वाहनधारकांना अधिक काळ थांबावे लागू नये यासाठी टोल नाक्यावरील सर्व बूथ सक्षमपणे कार्यान्वित रहावेत. यासाठी नाक्यावरील यंत्रणा अद्यावत करावी. टोल नाक्यावर इंधन मोठ्या प्रमाणात जळत राहिल्याने प्रदूषण वाढते, वाहनांची गर्दी झाल्यास याठिकाणी अपघात होण्याचा धोका असतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजचे आहे. वाहनांची गर्दी झाल्यास याठिकाणी अपघात होण्याचा धोका असतो. राष्ट्रीय महामार्गावरील नरखेड-वैराग, मोडनिंब, टेंभुर्णी, शेटफळ, माढा, मोहोळ तसेच अन्य ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा व कामांबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी करुन त्या प्रमाणे कार्यवाही करावी अशा सूचना बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



