👁 6 Views

अटल सौर कृषि पंप योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 27 :-   विजेची वाढती मागणी व पुरवठा, शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडणी याबाबीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महावितरणमार्फत अटल सौर कृ‍‍षि पंप योजना सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज केले.
जिल्ह्यात अटल सोलार कृषिपंप योजना राबविण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक मेघा शिंदे, कृषि विभागाचे पी. डी. पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा, सततच्या वीज बिलापासून त्याला दिलासा मिळावा यासासाठी शासनाने सुरु केलेली अटल सौर कृषि पंप योजना शेतकऱ्यांची हिताची आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात 210 अटल सौर कृषि पंपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत सुमारे 50 शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.  योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आपले मागणी अर्ज महावितरणकडे सादर करावेत.
योजनेच्या लाभासाठी लाभार्थी शेतकऱ्यास केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा राहणार आहे. योजनेचा लाभ अतीदुर्गम भागातील शेतकरी, महावितरण कंपनीतर्फे पैसे भरुन प्रलंबित ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजिकच्या काळत वीजपुरवठा करणे शक्य नाही असे शेतकरी, वैयक्तिक किंवा सामुदायीक शेतकरी व विहिरी यासाठी 3 एच.पी क्षमतेपासून सोलर पंप गरजेप्रमाणे बसविता येईल. बोअरवेल असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा घेता येतो. विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी  योजनेचा लाभासाठी पात्र ठरतो असेही बैठकीत सांगण्यात आले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *