पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 28 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेत मालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी समूह गटांनी मार्केटिंग व प्रोसेसिंग क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प अंतर्गत कृषि विभागाचा आत्मा मार्फत विक्रेता-खरेदीदार संम्मेलनाचे आयोजन येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले होते. संम्मेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रेता खरेदीदार व शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे उपसंचालक श्री. बरबडे, प्रतापसिंह परदेशी, रिलायन्स फ्रेशचे रवींद्र दिवे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, शेतकरी मोठ्या कष्टाने फळ, भाजीपाला यासह अन्य पिकांचे उत्पादन घेतो, पण त्याला विक्री व्यवस्था अवगत नसल्याने त्याच्या मालाचा उठाव होत नाही. शेत मालाची विक्री न झाल्याने त्याला नुकसानीस समारे जावे लागते. एकटा शेतकरी हा मार्केटिंग व प्रोसेसिंग मध्ये काम करु शकत नाही. शासनाने यासाठी शेतकरी समूह गट योजना, आठवडा बाजार योजना सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. केवळ योजनेसाठी अनुदान मिळते हा उद्देश न ठेवता बाजाराची गरज तपासून त्या पद्धतीने उत्पादन घेऊन आपले जीवनमान उंचवावे.
डॉ. भोसले म्हणाले, ‘कृषि विभागाचा आत्मा मार्फत अशी संम्मेलने तालुकस्तरावर आणि प्रत्यक्ष शेतकरी गटांच्या ठिकाणी व्हावीत. या ठिकाणी शेतकऱ्यांना माल काढणी, हाताळणी, पॅकिंग याबाबतचे मार्गदर्शन करणे तितकेच महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन झाल्यास शेतकरी, शेतकरी गट मार्केटिंग मध्ये क्रांती घडवितील’.
श्री. परदेशी म्हणाले, ‘मार्केट यार्डमध्ये आपला विकला जातो अशी धारणा शेतकऱ्याची आतापर्यंत होती. शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी, त्याच्या उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी शासनाने आठवडा बाजार योजना सुरु करुन शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. शासनाने सुरु केलेल्या गट शेती उपक्रम स्तुत्य असून शेतकरी गटानी उत्पादन, प्रोसेसिंग ते विक्रीपर्यंत सर्व कामात सक्रीय सहभाग घ्यावा.’
श्री. दिवे म्हणाले, रिलायन्स फ्रेस 2007 पासून सोलापूर जिल्ह्यात काम करत आहे. केळी, डाळिंब, लिंबू, पपई बरोबरच अन्य भाजीपला व फळांची खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी गटांनी चांगल्या दर्जाचा व उच्च प्रतिचा माल उपलब्ध करुन दिल्यास त्याची खरेदी रिलायन्स फ्रेशमार्फत करण्यास प्राधान्य दिले जाईल.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संमेलास रिलायन्स फ्रेश, एडीएम ॲग्रो इंडस्ट्रिज लातूर, ग्रॅंट थॅार्टन पुणे, दाळ मिल असोसिएशन प्रतिनिधी, जिल्हाधिकारी शेतकरी गटाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




