निलेश चाळक बीड प्रतिनीधी – ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. 28) आयोजित शेतकरी, कारखानदारांच्या बैठकीत ऊसदर जाहीर केला जात नसल्याने शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला.एका महिन्यापासून ऊस उत्पादकांच्या आंदोलनामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे तहसील कार्यालयात मंगळवारी कारखानदार, शेतकरी व आंदोलनकर्ते यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, तहसीलदार एन. जी. झंपलवाड, साखर सहसंचालकांचे प्रतिनिधी शेख रशीद यांची उपस्थिती होती.तालुक्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीत तीन तास चर्चा होऊनही ऊसदराचा तिढा सुटत नसल्याने संतप्त होऊन थावरे यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





