👁 10 Views

शहीद अशोक कामटे संघटनेचे विविध उपक्रम कौतुकास्पद- उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

शहीद अशोक कामटे सामाजिक व बहुउद्देशिय संघटना आयोजित रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांचे रक्तदान 
सांगोला/प्रतिनिधी ः येथील शहीद अशोक कामटे सामाजिक व बहुउद्देशीय संघटने मार्फत 26/11 हा दिवस शहीद दिन साजरा करणे हे कार्य कौतुकास्पद असून  प्रत्येक वर्षी होणार्‍या रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे असाच उपक्रम  मंगळवेढ्यातही घेवून आपण शहीदाच्या स्मृती जागविणार आहोत असे भावपूर्ण उद‍्गार  मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी काढले.
 यावेळी उपस्थितांकडून  शहीद जवान अमर रहे या घोषणा देवून  शहीद अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे, संदिप उन्नीकृष्णन आदिंना श्रध्दांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबिरात 151 रक्तदत्यांनी रक्तदान करून शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 
शहीद अशोक कामटे सामाजिक व बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. रविवार 26 रोजी संघटनेच्या वतीने 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद जवान व मृत्यूमुखी पडलेले निष्पाप नागरिकांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे बोलत होते यावेळी  नगराध्यक्षा राणीताई माने, पोनि राजकुमार केंद्रे, सपोनि अमुल कादबाने, अ‍ॅड. उद‍्यबापू घोंगडे, नगरसेविका अनुराधा खडतरे, स्वाती मगर, शोभा घोंगडे, सांगोला बार असोशिएशन अध्यक्ष अ‍ॅड संजीवनी खांडेकर, महिला सुतगिरणीच्या संचालिका श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, ज्येष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा सलगर, राजलक्ष्मी शिंदे, प्रमिला शिंदे,  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले, पत्रकार दिगंबर भगरे व किशोर म्हमाणे, दिलीप घुले, शहीद अशोक कामटे संघटनेचे संस्थापक निलकंठ शिंदे, अध्यक्ष अ‍ॅड. हर्षवर्धन चव्हाण, सचिव अच्युत फुले, अ‍ॅड. अप्पासो लवटे,  दादासो खडतरे, राजु मगर, अरूण कांबळे, समीर मणेरी, पंकज फुले, मकरंद पाटील, विठ्ठलपंत शिंदे, पद्मनाभ जगदाळे, संजय काळे, विलास पाटील, ओंकार देशपांडे, प्रकाश खडतरे, रविंद्र कुलकर्णी, धनंजय बनसोडे आदि मान्यवर उपस्थि होते.
फोटो मेल केला आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *