👁 7 Views

स्वराज्यनगरमध्ये निवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी:साडे आठ तोळे सोने लंपास



पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017

 निलेश चाळक बीड : शहरातील स्वराज्यनगर भागात बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत एका निवृत्त शिक्षिकेच्या घरातून साडेआठ तोळे सोने लंपास केले. याच भागातील आणखील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वराज्यनगर भागात विजया मधुकर शहाणे या निवृत्त शिक्षिका वास्तव्यास आहेत.  दोन दिवसांपूर्वी त्या पुणे येथे गेल्या होत्या. घर बंद असायचा फायदा घेऊन चोरांनी
  समोरील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील चार तोळ्याच्या बांगड्या, दोन तोळ्याची माळ व अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र असा साडे आठ तोळ्यांचा अडीच लाखांचा मुद्देमाल चोरांनी लांबविला. चोरांनी दागिने लंपास केल्यानंतर मागील दरवाजातून पोबारा केल्याचा संशय आहे.  सकाळी नळाला पाणी आल्याचे शेजाऱ्यांनी त्यांना फोनवरून कळविले. तेंव्हा त्यांनी मी पुण्याला असल्याचे सांगितले. तुमच्या घराचा दरवाजा उघडा कसा असे  विचारल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना कळविण्यात आले.
याच भागातील दुसऱ्या गल्लीतील रहिवाशी शिवाजी भागवत जोगदंड यांच्या घराचा कडी- कोयंडाही तुटलेला आढळला. त्यांच्या घरातील ऐवज सुरक्षित आहे. तेथे चोरीचा प्रयत्न फसला. विजया शहाणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेने स्वराज्यनगर भागात खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या भेटी
गुरुवारी सकाळी स्वराज्यनगरात झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनशाम पाळवदे, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. 
१५ दिवसांपूर्वीच घर खरेदी
विजया शहाणे या पुण्यात शिक्षिका होत्या. निवृत्तीनंतर त्या बीडला वास्तव्यास आल्या. स्वराज्यनगर भागात १५ दिवसांपूर्वीच त्यांनी घर खरेदी करुन त्या रहायला आल्या होत्या. पुण्यातील घर किरायाने देण्यासाठी त्या गेल्या होत्या
चोरांनी शहाणे यांच्या या नव्या घरातील दागिने साफ केले


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *