👁 8 Views

भरदिवसा महिलेचे एक लाख रूपये लंपास



पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीड -येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरुन एका महिलेचे एक लाख रुपये चोरांनी भरदिवसा लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
फैमिदा बेगम शेख रियाज (रा. तेलगाव नाका, बीड) या बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बँकेत आल्या होत्या. बँकेतून त्यांनी एक लाख रुपये काढले. त्यानंतर रिक्षात बसून त्या घराकडे जात होत्या. मात्र, रिक्षात बसत असताना दोघांनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली. फैमिदा बेगम यांना काही कळण्याच्या आतच चोरटे दृष्टिआड झाले. रोकड लंपास झाल्याने त्या भयभीत झाल्या. त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात जाऊन फिर्याद नोेंदवली. त्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. 
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी बँकेबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मागविले असून तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. दरम्यान ज्या अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्याच्या कायदा- सुव्यवस्थेचा कारभार पहिला जातो त्यासमोरूनच चोरांनी पैशांची बॅग लांबविल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *