पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017
स्पर्धेच्या युगात फार्मासिस्टनी कायद्याची अमलबजावणी करावी
-अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त वि.द.सुलोचने
स्वेरीत अन्न व औषध प्रशासनतर्फे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- योगायोगाने एकादशीदिवशीच फार्मासिस्टचा मेळावा होत आहे. स्वेरी सारख्या आदर्श असलेल्या महाविद्यालयात एकत्र येण्याचा आनंद होत असून फार्मासिस्टनी स्पर्धेच्या युगात चॅलेंज स्वीकारण्याबाबत कायद्याची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रेसिप्शननुसार गोळ्या औषधे देताना त्या रुग्णाकडून विस्वास मिळविला पाहिजे. तो रुग्ण औषधांपेक्षा फार्मासिष्टच्या वागणुकीने बरा व्हायला पाहिजे असे आपसात सुसंवाद होणे आवश्यक आहे. समजाला घातक असणार्या औषधांवर पूर्णपणे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी कायद्याची तरतूद देखील आहे. प्रत्येकात आपल्याकडे येणारा रुग्ण बरा व्हायला पाहिजे अशी मानसिकता निर्माण व्हायला हवी.’असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त(औषधे) वि.द.सुलोचने यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने एकदिवसीय केमिस्ट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सोलापूर जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशिएशन, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले होते त्यात प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त(औषधे) वि.द.सुलोचने उर्स्थित फार्मासिस्टना मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रशांत खलिपे यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षणाची गरज का भासली व औषधं विक्रेत्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत ते शासन दरबारी आवाज पोहचविणे गरजेचे का आहे’ हे सांगितले. सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, नुसत्या शिक्षणाने समाजापर्यंत पोहचू शकणार नसून त्याला जोड म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे. आपल्या जीवनात प्रशिक्षणाला खूप महत्व असून आपल्या जीवनातील बदल व विकास त्यामुळेच होत असतो. त्यासाठी प्रशासन देखील प्रशिक्षणावर प्रचंड खर्च करत असते. त्यामुळे प्रशिक्षण घेणे आवश्यकच आहे.’जिल्हाध्यक्ष मनुरे यांनी अन्न व औषध प्रशासन,ची भूमिका स्पष्ट करून जिल्ह्यातील फार्मासिष्टची औषधे विक्री करताना येणर्या अडचणी सांगितल्या.’ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष सोमेश्वर खरारे म्हणाले की, फार्मासिष्टकडून चुका होण्याअगोदर दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण द्या. वेळोवेळी प्रशिक्षण घेतले पाहिजे,’ असे सांगून पानटपरीत मिळणारी औषधे, बोगस डॉक्टर, डॉक्टर सप्लाय, एफ.डी.ई अशा अनेक गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधून घेवून कायद्याचे कोणी उलंघन करत असेल तर संघर्षाची व आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल.’ असा इशारा देखील त्यांनी दिला. औषध निरीक्षक रोशन राठोड व महेश कवतिकवार यांनी, औषधे विक्री करताना फूड लायसन, ड्रग म्हणजे काय ? यावर असलेल्या नियमावलीवर प्रकाश टाकून त्यातील दुर्लक्षित असणार्या गंभीर बाबींवर लक्ष वेधून घेतले. पुढे संपूर्ण दिवसभर औषधं व फार्मसी या संदर्भात सह आयुक्त (औषधे).सुलोचने व औषध निरीक्षक रोशन राठोड यांच्याकडून एल.सी.डी प्रोजेक्टरच्या साह्याने औषधं विक्री करताना पाळावयाचे नियम, डॉक्टरांच्या प्रिसिप्शन पासून ते विविध औषधांवरील एक्सपायरी डेट नंतर औषधांचे नेमके काय करायचे ? याची सविस्तर माहिती व कायद्याच्या चाकोरीत राहून हा व्यवसाय कसा करायचा ?याबाबत सविस्तर माहिती दिली.
संघटनेचे सचिव राजशेखर बारोळे, खजिनदार राजेश विरपे, संतोष शहा, सचिन साखरे, सुनील कोरे, बापु भांगे, शकील तांबोळी, प्रध्युम्न गांधी, सतीश सादिगले, महादेव जाधव, चंद्रकांत देशमुख, अरुण नागणे तसेच माढा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा व पंढरपूर या सहा तालुक्यातील सोलापूर ड्रगीस्ट अँण्ड केमिस्ट असोशिएशनचे सर्व पदाधिकारी व जवळपास 2000 औषध विक्रेते उपस्थीत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल देखील कमी पडला काहीजण बाहेर थांबूनच कार्यक्रमाची माहिती ऐकत होते. कार्यक्रमाची वाहन व्यवस्थेपासून सर्व सोय उत्तम करण्यात आली होती. यासाठी स्वेरीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतेले. बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर निरीक्षक रोशन राठोड यांनी आभार मानले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




