परळी वै. (महादेव गीते):- परळी येथील ज्ञानेश्वर पंतसंस्थेला खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी न्यायालयाने आरोपीस एक महिना तुरूंगवास व रू 60 000 दंडाची शिक्षा ठोठावली होती ती शिक्षा अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालयाने कायम ठेवली असुन आरोपीचे अपील फेटाळुन लावले व आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन बीड येथील तुरंगात रवानगी केली.
थोडक्यात हकीकत अशी की परळी येथील ज्ञानेश्वर पंतसंस्थेकडुन आरोपी सुधाकर माधवराव खोकले यांनी दिनांक.08.12.2007 रोजी वैयक्तीक कर्ज रू 60 000 घेतले होते.सदर कर्जाची वेळोवेळी मागणी केली असता आरोपी सुधाकर खोकले यांनी दिनांक 25.05.2009 रोजीचा उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचा रू. 30 000 चा धनादेश दिला होता.सदर धनादेश न वटल्यामुळे ज्ञानेश्वर पंतसंस्थेमार्फत बालाजी अप्पाराव भोयटे यांनी परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.सदर प्रकरणात साक्षीपुरावा होऊन आरोपीस उपरोक्त शिक्षा ठोठावली होती.
सदर शिक्षेविरूद्ध आरोपीने अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय येथे अपील केले होते.सञ न्यायालयात युक्तीवाद होऊन आरोपीचे अपील फेटाळुन लावले व परळी न्यायालयाचा निकाल कायम केला व आरोपीची तुरंगात रवानगी केली.ज्ञानेश्वर पंतसंस्थेच्या वतीने परळी न्यायालयात अँड.आर.व्ही.गित्ते यांनी काम पाहिले तर अंबाजोगाई न्यायालयात अँड.दत्तकुमार लांब यांनी काम पाहिले.आरोपीस शिक्षा होऊन तुरंगात शिक्षा भोगण्यासाठी रवानगी केल्यामुळे खोटा धनादेश देणारयांचे धाबे दणाणले आहेत.