👁 11 Views

प्रविण भाकरे यांना युवा साहित्य प्रबोधन पुरस्कार जाहीर



पंढरपूर Live 1 December 2017

   रांझणी/प्रतिनिधी
   यवतमाळ येथील काव्यांगण प्रतिष्ठान यांच्या मार्फत दिला जाणारा नवोदित युवा साहित्य प्रबोधन पुरस्कार रांझणी येथील प्रविण अनिल भाकरे यांना नुकताच जाहीर झाला आहे. असे पुरस्कार समितीने पत्राद्वारे कळविले आहे.
सदर  पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि.१७ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे राज्यस्तरीय काव्यांगण संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
     प्रवीण भाकरे यांनी साहित्य चळवळ ग्रामीण भागात रुजावी या हेतूने अनेक उपक्रम सुरु केले आहेत. साहित्य पुरस्कार, कविसंमेलने आयोजित करून त्यांनी नवीन हातांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
        पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.द.ता.भोसले, डॉ.देवानंद सोनटक्के, डॉ.राजाराम राठोड, लेखक अंकुश गाजरे, प्रा.सुभाष कदम, डॉ.चांगदेव कांबळे,कल्याणराव शिंदे, सुरेश शिंदे, गणेश गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *