👁 13 Views

कोंडी ग्रामविकासाचे मॉडेल ठरेल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन



पंढरपूर Live 1 December 2017

           सोलापूर, दि. 01 :-समाधान स्वंयपूर्ण दत्तक खेडेगांव योजनेमुळे कोंडी गावाच्या सर्वांगीण विकास होईल. हे गांव देशात विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, अशा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज केली.
            कोंडी-गावचे-ग्रामस्थ, जिल्हा नियोजन समिती तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने आयोजित समाधान स्वंयपूर्ण दत्तक खेडेगाव योजनेतील विविध विकास कामे आणि शहिद स्फुर्ती स्थळ  भूमीपूजन समारंभ आज पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एस.मालदार, सरपंच चंद्रभागा वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, डॉ.शकंर नवले, संजय नवले, देविदास शेळेकर आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘ गावे  स्वयंपूर्ण झाली तरच खरा विकास होईल. कारण आज शिक्षण, रोजगार अशा अनेक गरजांसाठी गावांकडून शहराकडे स्थलांतर होत आहे. गावातच तरुणांच्या हाताला काम मिळाले तर रोजगारासाठी शहराकडे वाढणारा ओघ कमी होईल. त्याचबरोबर वाढत्या शहरीकरणालाही आळा बसेल. गावातील मनुष्य बळ गावातच राहिल्यामुळे गावाच्या विकासाला अधिक गती येईल ’.
            ‘ गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभाग आवश्यक आहे. कारण लोकसहभागा मूळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे. त्याचप्रमाणे कोंडी गावाचा विकास लोकसहभागामुळे होईल’ असे श्री.देशमुख म्हणाले.
            यावेळी डॉ. विजय भटकर यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांचेही भाषण झाले. श्री. नानासाहेब कदम यांनी सूत्रसंचालन केले.
            कार्यक्रमानंतर कोडी आणि हिरज येथे समाधान स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव योजना राबवण्याबात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस प्रमुख वीरेश प्रभू, ज्येष्ठय शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर आदी उपस्थित होते
*********   


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *