👁 11 Views

प्राधिकरण अधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पंढरीतील पाणीपुरवठा धोक्यात!



सभापती विक्रम शिरसट यांनी घेतली गंभीर दखल..!
पंढरपूर Live 1 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- जिथून पंढरपूर शहरातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा होतो ती नवीन सुधारीत पाणीपुरवठा योजना 170 एचपी जॅकवेल ची इमारत खचु लागली आहे. त्यामुळे येथील यंत्रणा बंद पडून पंढरपूर शहरातील पाणीपुरवठा बंद पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या इमारतीची पाहणी पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट यांनी नुकतीच केली. येथील सर्व कामे पुन्हा उच्च दर्जाची करुन आवश्यक ती डागडुजीची कामे प्राधिकरण (एमजीपी) विभागानं करणं आवश्यक आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करुनही प्राधिकरण विभागाकडून याकडं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. जर ही कामे त्वरीत केली गेली नाहीत तर प्राधिकरण च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करु! असा इशारा पंढरपूर न.प.पाणीपुरवठा विभागाचे सभापती विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
170 एचपी जॅकवेल येथील पॅनल बोर्ड, पंपहाऊस ला खुप मोठा धोका निर्माण झाला आहे. प्राधिकरण (एमजीपी) मार्फत हे काम पुर्ण करण्यात आले आहे. परंतु येथील इमारतीचे काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याने ही संपुर्ण यंत्रणा कधीही बंद पडू शकते. याची दुरुस्ती करण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून एमजीपीकडे अनेकवेळा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु प्राधिकरकडून यासंदर्भात कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. पंढरपूर नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे सभापती विक्रम शिरसट यांनी याची गंभीर दखल घेऊन वरील ठिकाणची पाहणी केली. येथील कर्मचार्‍यांकडून याबाबत अधिक माहिती घेतली असता खरोखरच ही इमारत खचल्याने येथील सर्व यंत्रणा बंद पडूपन शहराचा पाणीपुरवठा खंडीत होण्याचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांना समजले. सभापती विक्रम शिरसट यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता. प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे समजले. 
170 एचपी जॅकवेल येथील पॅनलबोर्ड जिथे आहे, ती इमारत खचली असून या इमारतीच्या भिंतींनाही तडे गेलेले आहेत. 90 एचपी वरील पत्राशेड पुर्णपणे निकामी झाले आहे. येथे पावसाळ्यात पाणी साठून येथील इलेक्ट्रीक कामकाजास अडथळा येवून पाणीपुरवठा बंद पडू शकतो. येथील चेंबर व पाईपच्या भिंतीही निकृष्ट दर्जाच्या बांधल्याचे दिसून येते. येथील सर्व कामे पुन्हा उच्च दर्जाची करुन आवश्यक ती डागडुजीची कामे प्राधिकरण (एमजीपी) विभागानं लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. 
फोटो ओळी:- पंढरपूर नविन सुधारीत पाणी पुरवठा 170 एचपी जॅकवेल केंद्राची पहाणी करताना पंढरपूर नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, शिक्षण मंडळाचे सभापती संजय निंबाळकर, आरोग्य सभापती सचिन शिंदे व कर्मचारी.    


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *