👁 9 Views

एकादशी दिवशीच पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात मंदिर समिती कर्मचार्‍याकडून महाराज मंडळीस अपमानास्पद वागणुक… अर्धा तास एका अपंग भाविकास देवाच्या दारात ठेवले ताटकळत!


पंढरपूर Live 1 December 2017
पंढरपूर लाईव्ह विशेष:- दि. 30 नोव्हेंबर 2017 रोजी एकादशी दिवशी श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एक अपंग भाविक मंदिर समितीच्या एका कर्मचार्‍यास आत सोडण्याची विनंती करत होता. परंतु कर्मचार्‍याने त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत विचारणा करणार्‍या एका ह.भ.प. महाराजांनाही सदर कर्मचार्‍याने उध्दट वागणुक दिली. मंदिर समितीकडून अपंगांसाठी स्वतंत्र दर्शनाची सुविधा असूनही एका अपंगाला अर्धा तास देवाच्या दारात दर्शनासाठी एका पायावर ताटकळत उभं रहावं लागलं. याकडे मंदिर समितीचे धडाडीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष अतुलदादा भोसले यांनी त्वरीत लक्ष घालुन मंदिरातील उध्दट कर्मचार्‍यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. 

‘‘देवाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकात आपण ‘विठ्ठल’ पहातो!’’ असं खुद्द समितीच्या अध्यक्षांनी एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं होतं. मग याच भाविकारुपी विठ्ठलाचा असा अपमान  होत असेल तर याबाबत समितीचे अध्यक्ष कोणते पाऊल उचलतात? याकडं सर्व वारकरी भाविक भक्तांसह महाराज मंडळींचे लक्ष लागुन राहिलं आहे.   

अपंगाला अर्धा तास दर्शनापासून ताटकळत ठेवणारा कर्मचारी व महाराज मंडळींचा झालेला वाद बघितलेल्या प्रत्यक्षदर्शी वारकर्‍यांची प्रतिक्रिया.. बघा खालील व्हिडीओ…  



पंढरीतील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला येथील सुरक्षा कर्मचार्‍याने अर्धा तास ताटकळत ठेवले. ‘‘मंदिर समितीकडून अपंग भाविकांसाठी तात्काळ स्वतंत्र दर्शनाची सोय आहे. तुम्ही या अपंग भाविकाला दर्शनासाठी का सोडत नाही?’’ अशी विचारणा जयराम स्वामी वडगांवचे विठ्ठल महाराज यांनी संबंधीत कर्मचार्‍यास असता सदर कर्मचार्‍याने या महाराजांना उध्दट वागणुक देत, ‘‘प्रांताला सांगा अथवा कुणालाही सांगा, अगर कुठंही बातमी द्या, आम्ही घाबरत नाही!’’ अशी धमकावण्याच्या सुरात उर्मट भाषा केली. आमचा अपमान करुन अर्धा तास आमच्याशी वाद घालणारा हा कर्मचारी मात्र अपंग भाविकाला दर्शनासाठी ताटकळत ठेवून काहीजणांना मात्र वशील्याने दर्शनास सोडत होता. अशी माहिती विठ्ठल महाराज यांनी पंढरपूर लाईव्हशी संपर्क साधून दिली. व याबाबत आवाज उठविण्याची विनंती केली. 

महाराजांनी व्हाटसअपवर संपर्क साधून पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना खालील संदेश व बातमी सोबतचा व्हिडीओ तसेच अपंगाचा फोटो पाठविला आहे.

एक अंपग जो नीट चालूही शकत नव्हता.तो दर्शन रांगेत उभा होता.गर्दी तशी कमीच होती.त्या अंपगाची दया जयराम स्वामी वडगांवचे विठ्ठल महाराज यांना आली.त्यांनी देवस्थान कर्मचारयाला विनंती केली त्या अंपगाला पुढं घ्या.पण तो कर्मचारी इतका उधट होता की त्याने महाराजांना धमकी दिली की,प्रांताला सांगा अगर कुठही बातमी द्या.आम्ही घाबरत नाही.त्यानं अपंगत्वाचा अपमान तर केलाच,शिवाय विठ्ठल महाराजासारख्या अधिकारी वारकरयाचाही अपमान केला आहे.अर्धा तास वाद घालणारा हाच कर्मचारी अंपगाला ताटकळत ठेवून वशीलेवाल्यांना माञ सोडत होता.घटना अतिशय निंदणीय व निषेधार्य आहे.    मंदीर समितीने वारकरयांना अपमानस्पद वागणूक देणारया उधट कर्मचारयांवर कारवाई करण्यासाठी आपल्या महामंडळातील वरिष्ठांनी लक्ष घालावे ही विनंती.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *