👁 6 Views

फुलचिंचोलीत समता गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात



पंढरपूर Live 3 December 2017

          सुस्ते/प्रतिनिधी
फुलचिंचोली(ता.पंढरपुर) येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील समता परिषदेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
     येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पुणे येथील उद्योजक राजाभाऊ अंकुशराव यांना (सामाजिक कार्य ) सुस्ते (ता.पंढरपुर) चंद्रकांत माने यांना(उत्कृष्ट पत्रकारिता) पांढरेवाडी (ता.पंढरपूर) सिने कलाकार शैला शिंदे यांना( कला) पंढरपूर येथील रवी सोनार यांना (साहित्यिक ) पद्माकर चवरे पेनुर(ता.मोहोळ)यांना (शैक्षणिक) तर शिशिकांत पुदे अंकोली (ता.मोहोळ) यांना (कृषी)  पुरस्कार देऊनगौरविण्यात आले.
              यावेळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माळी,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे,विठ्ठल साखर कारखान्यानेच संचालक नारायण जाधव,महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव नागनाथ मोहिते,कुबेर गायकवाड,श्रीकांत बागल, केराप्पा मदने,नुतन पोलीस पाटील बालाजी माने,पत्रकार सावता जाधव आदी उपस्थित होते
           प्रस्तावित समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले. कार्यक्रमा यशस्वी पार पाडण्यासाठी शंकर बनसोडे,निलेश मोहिते अमोल माळी,श्याम गोडसे,टिल्लू गायकवाड,समाधान जाधव,राजु गायकवाड,माऊली पिसे,मुन्ना जाधव जयंता जाधव,नागनाथ जाधव व समता गौरव पुरस्कार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांने परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    चौकोट-  समता परिषदेचे कार्य कौतुकास्पद 
     क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली 12 वर्षापासुन येथील समता परिषद विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आहे.या उपक्रम बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्ततींना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर थाप टाकुन त्यांच्या कार्याची पोच पावती देत आहे. हे त्यांचे सामाजिक खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी काढले.

फोटो ओळी- फुलचिंचोली( ता.पंढरपुर) येथे समता परिषदेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *