👁 6 Views

तुम बिन जाऊँ कहाँ… कपुर घराण्यातील एक सुपरस्टार काळाच्या पडद्याआड..! सदाबहार चाॅकलेटी अभिनेता शशी कपुर यांचं निधन

पंढरपूर Live 4 December 2017

तुम बिन जाऊँ कहाँ… कपुर घराण्यातील एक सुपरस्टार काळाच्या पडद्याआड..!
सदाबहार चाॅकलेटी अभिनेता शशी कपुर यांचं निधन 





पंढरपूर Live 4 December 2017

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. 1961 मध्ये धर्मपुत्र या चित्रपटातून शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी पोस्ट बॉक्स 999 या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. अभिनेत्री नंदा यांच्यासोबत शशी कपूर यांचे मोहब्बत इसको कहते है, जब जब फूल खिले, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, राजा साब, रुठा ना करो यासारखे अनेक चित्रपट गाजले. राखी, शर्मिला टागोर, झीनत अमान सोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.





चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीवार चित्रपटातील त्यांची जुगलबंदीही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. त्यांनी जवळपास 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी 61 सिनेमे सोलो हिरो म्हणून गाजले, तर 55 चित्रपट मल्टिस्टारर होते. शशी कपूर यांची गाजलेली गाणीपरदेसियोंसे ना अखिया मिलाना (जब जब फूल खिले 1965) एक था गुल और एक थी बुलबुल (जब जब फूल खिले 1965) दिन है बहार के (वक्त 1965) नैन मिलाकर चैन चुराना (आमने सामने 1967) लिखे जो खत तुझे (कन्यादान 1968) नि सुलताना रे (प्यार का मौसम 1969) तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम 1969) थोडा रुक जाएगी तो (पतंगा 1971) ओ मेरी शर्मिली (शर्मिली 1971) आज मदहोश हुआ जाए रे (शर्मिली 1971) वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ (आ गले लग जा 1973) तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा 1973) ले जाएंगे, ले जाएंगे.. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (चोर मचाये शोर 1974) कभी कभी मेरे दिल में (कभी कभी 1976) रात बाकी बात बाकी (नमक हलाल 1982) जवानी जानेमन हसीन दिलरुबा (नमक हलाल 1982)   शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट जब जब फूल खिले (1965) हसीना मान जाएगी (1968) शर्मिली (1971) चोर मचाये शोर (1974) दीवार (1975) प्रेम कहानी (1975) चोरी मेरा काम (1975) कभी कभी (1976) फकिरा (1976) सत्यम शिवम सुंदरम (1978) त्रिशूल (1978) दुनिया मेरी जेब मे (1979) काला पत्थर (1979) सुहाग (1979) शान (1980) सिलसिला (1981) नमक हलाल (1982)


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *