पंढरपूर Live 5 December 2017
पंढरपूर दिनांक-2/12/2017 पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व्हेनंबर 140 मधील भुखंड क्रमांक 79 चे भुखंड धारक श्री.संजय शंकरराव माळी यांचे विरुध्द नगरपरिषदेने केलेले दिवाणी अपील नंबर 21/2013 हे जिल्हा न्यायाधीश-3 श्री.सी.एस.बाविस्कर यांनी मंजूर केले आणि सदर भुखंड क्रमांक 79 चा ताबा पंढरपूर नगरपरिषदेस निकाल तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावा.वादग्रस्त भुखंडावरील श्री.माळी यांचे मालकीची सामुग्री तीस दिवसाचे आत त्यांनी काढून घ्यावी.तसेच वादग्रस्त भुखंडाच्या किंमतीपोटी दि.3/2/1990 रोजीच्या खरेदीखताव्दारे पंढरपूर नगपालिकेने घेतलेले रुपये 32,100/- हे संजय माळी यांना निकाल तारखेपासून तीस दिवसाचे आत परत दयावेत.अशा आशयाचा निकाल पंढरपूर जिल्हा न्यायाधीश श्री.बाविस्कर यांनी नुकताच दिला.
या बाबत वस्तुस्थिती अशी आहे की,पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 140 मधील भुखंडावर औद्योगिक वसाहत स्थापन करणेत आली व सन 1983 मध्ये त्यामधील 51 भुखंड लघुउद्योजकांनी भाड्याने देणेत आले. त्यानंतर सदर लघुउद्योजकांनी सन 1984 मध्ये हे भुखंड मालकी हक्काने विकत देण्याची विनंती नगरपरिषदेकडे केली. नगरपरिषदेने दिनांक 9-11-1984 रोजीच्या ठराव क्रमांक 103 अन्वये सदरचे प्लॉट लघुउद्योजकांना मालकी हक्काने विकत देणेचा ठराव केला व प्रस्ताव शासनेच्या मान्यतेसाठी पाठविला.महाराष्ट्र शासनाने नगरपालिका अधिनियम 1965 अंतर्गत महाराष्ट्र नगरपालिका (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण)नियम 1983 मधील नियम क्र 26 खालीली अधिकारांचा वापर करून शासन निर्णय दिनांक 24-2-1989 अन्वये काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन लघुउद्योजकांना भाड्याने दिलेले प्लॉट मालकी हक्काने विकत देण्याच्या नगरपरिषदेच्या प्रस्तावास मान्यता दिली. शासनाच्या सदर निर्णयास पंढरपुरातील काही नागरीकांनी जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.सदर जनहित याचिका क्रमांक 488-1990 मधील मा उच्च न्यायालयाने दिनांक 15-2-2003 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयास प्रमाणे सदरचा शासनाचा निर्णय रद्द करणेत आला. आणि त्यामध्ये नियम 26 मध्ये विशेष बाब म्हणुन सदरचा नियमातील नियम क्रं 7 व 8 ला अपवाद करून शासनाने सुधारित आदेश देवुन दिनांक 27-5-2005 रोजी नवीन शासन निर्णय काढला.या शासन निर्णयानुसार नगरपरिषदेने सन 2007 साली सर्व्हे केला. परंतु नियमानुसार भुंखड धारक दिलेल्या भुंखडाचा वापर करित नसल्याने दिसुन आल्याने त्यांना भुंखड धारक दिलेल्या भुंखडाचा वापर करित नसल्याचे दिसुन आल्याने त्यांना भुंखड परत नगरपरिषदेकडे कब्जेत देणेबाबतच्या नोटीसा देण्यात आल्या परंतु त्यांची पुर्तता न झाल्याने सदर भुंखडा धारकाविरूद्ध पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात मालकी हक्काने कबजा मिळणेचे दावे दाखल करणेत आले. अशाच प्रकारचा दावा श्री माळी यांचे विरुध्दही नगरपरिषदेने दाखल केलेला होता परंतु श्री माळी हे दिनांक-27/5/2005 रोजीच्या जी आर चे लाभार्थी ठरतात. या कारणास्तव नगरपरिषदेचा दावा फेटाळणेत आलेला होता.त्या विरुद्ध केलेले सदरचे अपील हे गुणवत्तेवर चालून मान्य करणेत आले.या अपीलामध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक24/2/1989 रोजीचा शासनाचा जी.आर.रद्द करणेत आला.त्या क्षणीच भुखंडधारकांची मालकी संपुष्टात आली.असे ठळकपणे नमुद करुन तसेच श्री.संजय माळी हे दिनांक.27/5/2005 रोजीचे जी.आर. चे लाभार्थी होवू शकत नाहीत.हे देखील नमुद करुन त्यांचा बचाव रद्द करुन नगरपरिषदेचे अपील गुणवत्तेवर मंजुर करणेत आले.आणि त्यामध्ये वरील प्रमाणे आदेश देणेत आला.
या निर्णयाकडे पंढरपूर नगरपरिषदेच्या औद्योगिक वसाहतीमधील भुखंड धारकांचे लक्ष लागलेले होते.सदर औद्योगिक भुखंद धारकांमध्ये या निकालाने खळबळ माजलेली आहे.या कामी पंढरपूर नगरपरिषदेतर्फे जेष्ठ विधीज्ञ श्री.एस.आर.कुलकर्णी यांनी तर श्री संजय माळी यांचेतर्फे अँड.श्री रानडे यांनी काम पाहिले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





