पंढरपूर Live 6 December 2017
चैतन्य महाराज देगलुरकर, ना. पंकजा मुंडे, ना. धनंजय मुंडे , दाजी पणशीकर , जनार्दन वाघमारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
◆ महादेव गित्ते
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. …
परळी शहरातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा 71 व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन परळी चे कार्यवाह प्रा.मधु जामकर यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा 9 डीसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यास चैतन्य महाराज देगलुरकर, ना. पंकजा मुंडे, ना. धनंजय मुंडे , दाजी पणशीकर ,जनार्दन वाघमारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
अमृत महोत्सवी गौरव सोहळा 9 डीसेंबर रोजी सायं. ७ वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर या ठिकाणी होणार आहे . या सोहळ्याच्या दिमाखदार संयोजनासाठी अमृत महोत्सवी गौरव समिती जय्यत तयारी करीत आहे.तसेच विविध कार्य समित्यां कार्यरत झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व साहित्यविश्वात भरीव योगदान असलेल्या परळी शहरातील प्रा.मधु जामकर यांचा यथोचित गौरव परळीकरांच्या वतीने करण्यात येणार असून या सोहळ्याच्या दिमाखदार संयोजनासाठी सर्वांनी सहभाग द्यावा तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.मधु जामकर अमृत महोत्सवी गौरव समितीच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब वाघमारे, स्वागताध्यक्ष विकासराव डुबे, कार्याध्यक्ष राजेश देशमुख, कार्यवाह बाजीराव धर्माधिकारी, कोषाध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, गौरवग्रंथ समिती प्रमुख डाॅ. महेशचंद्र कवठेकर यांच्यासह सर्व समिती प्रमुख, सदस्य गौरव समिती यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






