👁 5 Views

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त कॉग्रेसच्या वतीने अभिवादन

पंढरपूर Live 6 December 2017

डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे विचारच ओबीसींना तारतील-समीर कोळी
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच ओबीसींना तारतील हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.ओबीसींना आरक्षणचा लाभ मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.त्यांनी मानवाकडे मानवतेच्या द्रष्टीने पहावयाची शिकवण या देशाला दिली म्हणूनच आज वर्णव्यस्थेचा कलंक पुसून हा देश जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम झाला आहे असे प्रतिपादन कॉग्रेेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांनी केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कॉग्रेेसच्या वतीने त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी समीर कोळी बोलत होते.
              यावेळी कॉग्रेेसचे ज्येष्ठ नेते मामा फलटणकर,पंढरपूर शहर कॉग्रेेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,उपाध्यक्ष प्रा.अशोक डोळ,प्रा.मारुती भोसले,जिल्हा चिटणीस अमर सुर्यवंशी,नागेश गंगेकर,महिला कॉग्रेेसच्या आशाताई बागल,युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे,राजेश उराडे,ॠषीकेष साठे,समाधान रोकडे,शिवाजी धोत्रे,दिपक येळे,महेश जाधव,सौरभ भादुले,बबलू बोराळकर,बाळासाहेब आसबे,बाळासाहेब खडके,सोमेश अभंगराव यांच्यासह कॉग्रेेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *