👁 5 Views

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या संस्कृती निकमचे जापनीज परीक्षेत यश

पंढरपूर: प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपूर) येथील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली संस्कृती अनिल निकम हिने जपान सरकारचे जेएलपीटी एन ५ हे जागतिक दर्जाचे प्रमाणपञ प्राप्त केले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.


  कोर्टी (ता.पंढरपूर) येथील इन्स्टिट्युट मध्ये जापनीज भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. हि भाषा आय. टी. क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या खुप मोठ्या प्रमाणात जापनीज कंपन्या व्यवसायासाठी येत आहेत. अशा या कंपनीत जापनीज भाषा लिहता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलने ऑनलाईन माध्यमातून अत्यंत माफक दरात जापनीज भाषेतील प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. 


   जापनीज भाषेतील परीक्षेत संस्कृती निकम हिने अगदी अल्प वयात यश प्राप्त केले आहे.

  जापनीज भाषेतील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट जपान देशामध्ये भरगच्च पगाराची नोकरीची संधी प्राप्त करता येते. जापनीज भाषेचे प्रशिक्षण देणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल हे एकमेव स्कूल आहे.


     संस्कृती अनिल निकम हिने जापनीज भाषेतील परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर डाॅ. कैलाश करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम व स्वाती निकम आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छ दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *