👁 7 Views

पंढरपूर शहर भाजपाने केले मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याचे दहन



पंढरपूर Live 8 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संतापजनक विधान करणार्‍या काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याचे दहन व जोडेमार आंदोलन चौफाळा येथे पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी अय्यर यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच बोंबाबोंब करण्यात आली. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला. यावेळी पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर, कैलास कारंडे, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, रेखा कुलकर्णी, महिला शहराध्यक्षा अपर्णा तारके, पूजा बोरामणीकर, पल्लवी कोरे, वाणी कोरे, रेणुका कोरे, गीता खाडीलकर, भक्ती तोडकरी, कल्पना तितोड, अश्विनी नडगिरे, सुनिता गुंड, निता गायकवाड, कल्पना गवळी, राधा परदेशी, रूपाली यलगम, डॉ. प्राजक्ता बेणारे, सुरेंद्र कवठेकर, शिरीष कटेकर, आनंद नगरकर, संजय पालकर, विजय कुलकर्णी, त्रिंबक महाजन-बडवे, महेश भंडारकवठेकर, जगदीश डांगे, प्रविण सुरवसे, शंतनु दंडवते, लखन माळी रेश्मा मोळक, हर्षदा नगरकर, प्रियांका भंडारे, शीतल कुलकर्णी, पूर्वा पांढरे आदी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनास पंढरपूर शहरातील नागरिकांनीही पाठींबा दिला. तसेच वाद्ग्रस्त काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
फोटो ओळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व संतापजनक विधान केल्याच्या निषेधार्थ पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने पंढरपूर येथील गोपाळकृष्ण मंदिराजवळ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व जोडेमार, बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *