👁 9 Views

पै.मंगेश दिलीप कोळी यांचा सत्कार

पंढरपूर Live 13 December 2017
 पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी येथे पै.मंगेश दिलीप कोळी यांचा सत्कार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड यांच्या हस्ते करण्यात आला पनवेल येथे नुकत्याच झालेल्या  पै.खशाबा जाधव राष्ट्रीय युवा कुस्ती स्पर्धेत 76 किलो वजन गटात पुणे येथील मंगेश दिलीप कोळी यांनी प्रथम क्रमांक व स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने धुळे येथील मॅटकुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केल्याने भैरवनाथवाडी येथे धनवडे परिवार नारायण ग्रामपंचायत सुर्य नारायण मंदिर ट्रस्ट विविध कार्यकारी सोसायटी लक्ष्मणराव धनवडे मिञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  करण्यात आले होते  यावेळी सुर्य नारायण मंदिर समितीच्या नुतन अध्यक्ष गहिनीनाथ चव्हाण उपाध्यक्ष विजय कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. 
       यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती लक्ष्मण धनवडे म्हणाले कि, ऑलम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मंगेश कोळी याने प्रथम पुरस्कार प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. मोठ्या जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने हे यश मिळविले आहे. त्याचे परिश्रम त्यास असेच मोठे यश संपादन करण्यास समर्थ ठरेल व यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. 
          यावेळी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे मा उपसभापती लक्ष्मणराव धनवडे सरपंच विठ्ठल माने  पै. दिलीप कोळी मा.सरपंच नितीन मस्के प्रा.दत्ताञय मस्के पोपट पाटील भास्कर गुंड शिवाजी वसेकर ज्ञानेश्वर बरडे शिवलिंग हिंगमिरे पांडुरंग घाडगे लहू शिंगटे दादा डुबल माऊली मस्के डाॅ.  भाऊसाहेब माने उपसरपंच बळवंत धनवडे महादेव सरडे डाॅ. अनिल गाजरे भानुदास गाजरे बाळासाहेब सुतार अशोक घाडगे दिलीप गाजरे आण्णा कोळी अण्णा हजारे श्रीधर कोळेकर हारीभाऊ खरात आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारूती वाघमोडे यांनी केले






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *