👁 6 Views

प्रत्येकाला अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे- प्रकाश सुर्यकर

पंढरपूर Live 13 December 2017
परळी वै (प्रतिनिधी) ः बीड जिल्हयाचे भूमीपुत्र व माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे प्रत्येकासाठी अभिमान व स्वाभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व होते असे प्रतिपादन दै. दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर यांनी केले. ते लोकनेते गोपीनाथराव पत्रकार भवन येथे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात साजरी करण्यात आलेल्या गोपीनाथराव मुंडे यांच्या तैलचित्रास प्रथम प्रकाश सुर्यकर व तालुकाध्यक्ष प्रेमनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रकाश सुर्यकर यांनी गोपीनाथराव मुंडे हे आपल्या बीड जिल्हयाला गौरव प्राप्त करून देणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाडयाचा विकास  खुंटला असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. सिध्दार्थ तायडे यांनीही आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास महादेव शिंदे, रानबा गायकवाड, शेख मुकर्रम, समीर इनामदार, सुकेशीनी नाईकवाडे, भगवान साकसमुद्रे, बालासाहेब फड, अशोक मुंडे, अनिल चिंडालीया, विकास वाघमारे, संजीव रॉय, प्रा. ब्रम्हानंद कांबळे, शेख गणी, ज्ञानेश्‍वर दराडे, ओम मिरकले, विनायक काळे, विद्याधर सिरसाठ आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान साकसमुद्रे यांनी केले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *