👁 8 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्या रोजगार व नोंदणी मेळाव्यास उत्सुर्त प्रतिसाद शहरातील ९ उद्योजकांचा सहभाग – १९२ ची प्रत्यक्ष मुलाखत.



पंढरपूर Live 14 December 2017
पंढरपूर नगरपरिषद व जिल्हा कौशल्य विकास – रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर

यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४/१२/२०१७ गुरवार रोजी आयोजित रोजगार मेळाव्यास उत्सुर्त प्रतिसाद
लाभला. पंढरपूर नगरपरिषद वतीने लोकमान्य विद्यालय सभागृहामध्ये आयोजित मेळाव्यास शहरातील ९
उद्योजकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १९२ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिल्या व त्या मधील कमीत कमी
१०६ उमेदवारांची नियुक्ती होणे अपेक्षीत आहे.


          नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, नगरपरिषद, पंढरपूर यांनी जास्तीत जास्त लाभार्थिंयानी
या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन विविध प्रसिद्ध माध्यमातून केले होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास –
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासनाच्या दिनदयाळ
अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर आणि जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडुन आज मोफत नोकरी आणि कौशल्य विकास नोंदणी
मेळावा आयोजीत करण्यात आला होता.


या मेळाव्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, व्यवस्थापक योगेश
काळे, मुख्याध्यापक श्री. डिंगरे, समूह संघटक सचिन सरवदे, सहयोगिनी सौ.सुजाता राउत, सौ.ज्योती पवार,
सौ.अभंगराव, राघु अभंगराव, अमोल सर्वगोड, सुभाष माने यांनी परिश्रम घेतले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *