👁 6 Views

काँग्रेस व तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी शंकरराव सुरवसे इच्छूक


पंढरपूर Live 16 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेस आय व तिर्थक्षेत्रविकास आघाडीकडून संधी मिळाली तर आनंदच आहे. अशी भावना युवक काँग्रेस आय चे पंढरपूर शहराध्यक्ष शंकर सुरवसे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेस आय व तिर्थक्षेत्रविकास विकास आघाडीकडून पंढरपूर नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेस आय चे युवक शहराध्यक्ष शंकरराव सुरवसे हे इच्छूक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा कालावधी संपत आल्याने या पदासाठी इच्छूकांची संख्या वाढलेली आढळत आहे. पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकरराव सुरवसे यांच्या नावाची चर्चाही जोरदारणे सुरु असल्याने पंढरपूर लाईव्हने याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षापासून मी काँग्रेस आय व तिर्थक्षेत्र विकास आघाडीसाठी एकनिष्ठतेने कार्य करत आहे. पंढरपूर शहरातील विविध नागरी समस्या व सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी आक्रमकपणे मी विविध आंदोलने केली, आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. पंढरपूर शहरात काँग्रेस आय ची ताकद वाढविण्यासाठीही मी एकनिष्ठतेने व प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. माझे हे कार्य यापुढेही असेच अखंडीत चालु राहील. पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षश्रेष्ठी, आमदार भारतनाना भालके व सर्व नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी नियुक्ती झालीच तर त्यात मला आनंदच वाटेल. अशा भावना त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या. 

एकुणच आमदार भारतनाना भालके यांच्याकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी डी. राज सर्वगोड व शंकरराव सुरवसे या दोघे इच्छूक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आत्ता या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात आमदार भारतनाना भालके व इतर पक्षश्रेष्ठी आपली पसंती टाकतील याची उत्कंठा पंढरपूरकरांना लागुन राहिली आहे. कधी नव्हे ती यावेळी स्वीकृत नगरसेवकपदासाठी एवढया मोठया प्रमाणात पंढरपूर शहरामध्ये चर्चा चांगलीच रंगलेली आहे.  


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *