👁 8 Views

हलगीच्या कडकडाटात,प्रचंड गर्दीत,मंत्र्यांच्या उपस्थितीत, जिल्हाध्यक्षांच्या हस्ते भाजपा पदाधिकार्‍यांच्या झाल्या निवडी


पंढरपूर Live 17 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर शहर भाजपा पदाधिकार्‍यांची निवड जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे देऊन रूक्मिणी पटांगण येथे करण्यात आली.
यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष संजय वाईकर, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, अजय जाधव, रेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला आघाडी अध्यक्षपदी अपर्णा तारके, महिला शहर सरचिटणीपदी आरती बसवंती, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी विदुल अधटराव यांची तर भाजपा युवा मोर्चा युवती प्रमुखपदी देवयानी दामोदरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. सहकारमंत्र्यांचे आगमन होताच हलग्यांच्या कडकडाटात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करून त्यांचे स्वागत केले.
यावेळी शंतनु दंडवते, आनंद नगरकर, अनंत तरकसबंद, राम चौगुले, सौदागर मोळक, हर्षदा नगरकर आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध पदांवर युवा वर्गाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. युवक वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. महिला, युवती व तरूणांची संख्या लक्षणीय होती. अवघा मंदिर परिसर भगवा झाला होता. 
भारतीय जनता पार्टीच्या पंढरपूरच्या इतिहासात इतक्या मोठ्या जल्लोषामध्ये पदाधिकार्‍यांची निवड होण्याची पहिलीच घटना आहे. संजय वाईकर हे पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पक्षात जान आली असून शहराच्या विविध भागातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील तरूणांचा लोंढा पक्षाकडे येऊ लागला आहे. आता पक्षाकडे येणार्‍यांची संख्या वाढली असून भारतीय जनता पार्टीची शक्ती आगामी काळात शहरात वाढल्याचे दिसून येणार आहे. जे इच्छुक आहेत अशांच्या अनेक चाचण्या घेऊन नियुक्त्या केल्या जात आहेत. या नियुक्तीबाबतही काटेकोर यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. भावी काळात कर्तृत्व सिद्ध करणार्‍या व पक्ष वाढीस कारणीभूत ठरू शकतील, अशा तरूणांनाच शहर कार्यकारणीमध्ये वाव दिला जात आहे.
एकूणच यावेळची कार्यकारणीही एका वेगळ्या पद्धतीने निर्मित होत असून भविष्यात त्याचे चांगले पडसाद दिसून येणार आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी विदुल अधटराव यांची निवड केल्याबद्दल तरूणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. योग्य व्यक्तीची निवड झाल्याची अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. या तरूण कार्यकर्त्यांनी निवड होताच जल्लोषात गावातून रॅली काढली.
फोटो ओळी : पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी अध्यक्षपदी अपर्णा तारके, महिला शहर सरचिटणीसपदी आरती बसवंती, भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी विदुल अधटराव, भाजयुमोच्या युवती प्रमुखपदी देवयानी दामोदरे यांची निवड करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर, बाजार समितीचे सदस्य अजय जाधव, मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, रेखा कुलकर्णी आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *