👁 6 Views

वरपगाव ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप; गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच भरविली शाळा


पंढरपूर Live 19 December 2017
निलेश चाळक अंबाजोगाई : अंबाजोगाई : तालुक्यातील वरपगाव शाळेतील मुख्याध्यापकासहीत इतर शिक्षकांनाही सातत्याने निवडणूक कामाला जुंपले जात असल्याने शिक्षकांअभावी विद्यार्थांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकून सर्व विद्यार्थाना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आणले आणि त्याच ठिकाणी शाळा भरवली. दिवसभराच्या आंदोलनानंतर सायंकाळच्या सुमारास गटशिक्षणाधिकारी यांनी उद्या मंगळवार पासून दोन शिक्षक रुजू होतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले.

याविषयी अधिक माहिती अशीं की, अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मुख्याध्यापकासह एकूण ८ शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापैकी एक शिक्षक पदोन्नतीने बदलून गेल्याने एक जागा रिक्त झाली असून उर्वरितपैकी एक शिक्षक तहसील कार्यालयाच्या कामा साठी प्रतिनियुक्तीवर असून एक जण निवडणूक कामासाठी घेण्यात आलेला आहे. आज सोमवारी सकाळी आणखी एका शिक्षकाची तहसीलमध्ये प्रतीनियुक्तीसाठी ऑर्डर काढल्याचे समजते. आणखी एक शिक्षिका अर्जित रजेवर असल्याने शाळेत वास्तवात फक्त दोन शिक्षिका आहेत. मागील दोन महिन्यापासून कमीअधिक प्रमाणात असाच प्रकार सुरु असल्याने याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. ग्रामस्थांनी अनेक अर्ज विनंत्या करूनही याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सोमवारी शाळेला कुलूप ठोकून सर्व विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आणले आणि तिथेच शाळा भरवून ठिय्या आंदोलन केले. दुपारनंतर गट शिक्षणाधिकारी शिंदे यांनी कार्यालयात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. परंतु, दोन शिक्षक उपलब्ध करून दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगताच शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याची परवानगी घेतली. उद्या मंगळवारी सकाळी दोन शिक्षक शाळेत रुजू होणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात सरपंच अंकुशराव शिंदे, शालेय समिती अध्यक्ष गोविंद जाधव, उपाध्यक्ष संजय गोरे व समिती सदस्य संजय काळे, खंडेराव टेमकर आणि ग्रामस्थांसहित शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *