👁 5 Views

कु-हाडीच्या दांडयाने मारहाण :चार जणांना एक वर्ष सक्तमजुरी व 24 हजार रूपये दंड !


पंढरपूर Live 19 December 2017m
परळी न्यायालयाचा निकाल
परळी वै :- 
मागील जुन्या भांडणाच्या कारणावरून कु-हाडीच्या दांडाने एक जणाचे मांडीचे हाड मोडल्याच्या आरोपावरून ब्रह्मवाडी येथील चार जणांना परळी न्यायालयाचे न्या.एम.जे.डौले यांनी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी रू.6000 दंडाची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात हकीकत अशी की ब्रहमवाडी ता.परळी वैजनाथ येथील दिनांक 26.05.2008 रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी  पांडुरंग गोविंदराव मुंडे हे घराकडे जात असताना आरोपी साहेबराव प्रभु फड यांने मागील लहान मुंलाच्या भांडणाच्या कारणावरून कु-हाडीच्या दांडयाने मांडीवर मारून मांडीचे हाड मोडले.त्यावेळी आरोपी परमेश्वर बळीराम मुंडे व मधुकर बळीराम मुंडे यांनी फिर्यादीस धरून ठेवले होते.त्यावेळी आरोपी मोतीराम प्रभु फड यांने लाथा बुक्क्याने मारहान केली वगैरे मजकुरावरून परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला गु.र.नं.325 323 504 506 34 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डि.आर.शेप यांनी करून चारही आरोपीविरद्ध परळी न्यायालयात दोषारोपपञ दाखल केले होते.सरकारी वकीलांनी सदर गुन्हयात कलम 326 भा.दं.वि वाढविण्याचा अर्जावरून कलम वाढवले होते. न्यायालयात साक्षीपुरावा होऊन चारही आरोपीना कलम 326  323 34 भा.दं.वि खाली प्रत्येकी एक वर्षाचा सश्रम कारावासाची व प्रत्येकी रू 6000 दंडाची शिक्षा ठोठावली.दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठाेठावली.दंडाच्या रक्कमेतुन रू 10 000 रूपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणुन देण्याचा आदेश दिला.सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी आभियोक्ता अँड.एस.बी.गिरी यांनी काम पाहिले.त्यांना अँड.पि.सी.गिराम यांनी सहकार्य केले.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *