पंढरपूर Live 21 December 2017
पत्रकार संरक्षण समितीचा दणका
मराठी चित्रपटांना मिळणार प्राईम टाईम
नागपूर /पुणे : पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार – सांस्कृतिक करमणूक विभागा तर्फे मराठी चित्रपट देवा व गच्ची या चित्रपटांना प्राईम टाईम देण्यासाठी नागपूर येथे सांस्कृतिककार्यमंत्री विनोद तावडे यांना पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार – सांस्कृतिक करमणूक विभागा तर्फे चित्रपटांना प्राईम टाईम देण्यासाठीजिल्हाध्यक्ष डॉ. आशिष आटलोए यांनी निवेदन देण्यात आले , यावेळी सांस्कृतिक मंत्री मा.विनोद तावडे यांनी मराठी चित्रपटास योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आणि मराठीतील ‘देवा’ आणि‘गच्ची’ हे चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ‘टायगर जिंदा है‘ चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे.यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे . मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे.
मराठी चित्रपटांना आपल्याच राज्यात स्क्रीनिंगसाठी भीक मागावी लागते, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे . महाराष्ट्रात मराठी सिनेमालाच प्राधान्य मिळायला हवं. मराठी सिनेमांना स्क्रीन न देणाऱ्या मल्टिप्लेक्सचे लायसन्स रद्द करावेत, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी निवेदनाद्वारे तावडे यांच्याकडे केली आहे .
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





