पंढरपूर Live 21 December 2017
सरपंचपदाचा लक्ष्मीबाई होळंबे यांनी स्वीकारला पदभार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार लक्ष्मीबाई अशोकराव होळंबे यांनी स्विकारला. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रथम सभेत सर्वानुमते उपसरपंचपदाची निवड सुद्धा बिनविरोध करण्यात आली.असून उपसरपंचपदी सौ.लक्ष्मीबाई पाळवदे यांची बुधवारी दि.20 डिसेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुक्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणूकीत पहिली हेळंब ग्रामपंचायत ग्रामस्थांनी बिनविरोध काढली होती. ग्रामसेवक तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रज्ञा भोळे यांनी निवड प्रक्रीया पार पडली व थेट जनतेतून गावाचा कारभार सांभाळण्याची महत्तवपुर्ण जबाबदारी नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मीबाई होळंबे यांना व आपल्यासोबत उपसरपंचपदी सौ.लक्ष्मीबाई पाळवदे यांची बिनविरोध निवड करून यांना सोबत घेऊन गावाचा कारभार सांभळण्याची संपुर्ण जबाबदारी स्वीकारली व ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी स्वीकारला पदभार.
हेळंब ग्रामपंचायतीच्या प्रथम बैठकीस नवनिर्वाचित सदस्य सौ.मंदोदरी सुधाकर होळंबे, सौ.द्वारकाबाई विश्वनाथ आंधळे, वैजनाथ भानुदास आंधळे ,दत्तू वामन लांडगे, सौ.बबिता परमेश्वर होळंबे,दत्ता मुंजा पाळवदे, सौ.भारतबाई भानुदास पाळवदे हे उपस्थिती होते.या निवडीनंतर गावकऱ्यांच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, ह.भ.प.नवनाथ महाराज आंधळे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादेव होळंबे, यांनी नुतन पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार केला.
यावेळी विठ्ठलराव आंधळे, प्रा.नारायण पाळवदे, बालाजी आंधळे, गणपत आंधळे, युवानेते मोहन होळंबे, दिनकर पाळवदे, भगवान पाळवदे, रमेश होळंबे, प्रल्हाद होळंबे, प्रल्हाद आंधळे, आत्माराम होळंबे, निवृत्ती आंधळे व सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ, हितचिंतक, सहकारी, कार्यकर्ते, शेतकरी, पदाधिकारी व इतर मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान दोन्ही पदाधिकार्यांनी पदभार स्विकारल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.येथील नवनिर्वाचित उपसरपंच सौ.लक्ष्मीबाई पाळवदे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच म्हणाले कि, गावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविणार असून महिलांचे संघटन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
—————————— ———-
हेळंब ग्रामपंचायतच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- शिवाजी गुट्टे
राजाच्या ग्रामविकास मंत्री व महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे नेतृत्वाखाली
हेळंब ग्रामपंचायतीसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, शासनाकडुन निधी भरगोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ही दिले. राज्य शासनाच्या अनेक योजना कशा राबवायच्या हा अधिकार ग्रामपंचायतीला मिळालेला आहे यामुळे या योजनांचा फायदा गावातील गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त करून देण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांनी त्याचा उपयोग करावा. असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांनी ग्रामपंचायतच्या स्तकार समारंभ कार्याक्रम प्रसंगी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





