👁 9 Views

परळी तालुक्यातील मांडवा फाट्यावर अपघात.. 1 जण ठार

पंढरपूर Live 21 December 2017
परळी तालुक्यातील मांडवा फाट्यावर अपघात.. 1 जण ठार
परळी     तालुक्यातील मांडवा फाट्यावर आज (दि.२०) रात्री ११ च्या सुमारास दोन मोटारसायकलचा  आपघात होउन एक ठार चार  जखमी झाल्याची घटना घडली आहे.  उपचारासाठी परळी  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर  पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
धर्मापूरी फाटा ते लातूर रस्त्यावर मांडवा गावाकडे वळणार्या रस्त्यावर दोन मोटारसायकलचा धडक होऊन भिषण आपघात घडला. या आपघातात मांडवा येथील रहिवासी   तुकाराम गुट्टे वय ४० हे  जागीच मयत झाले. तुकाराम हे परळीकडून मांडवा गावाकडे येत असताना फाट्यावर गावाकडे वळताना नंदनंज कडून धारावती तांडा कडे जाणाऱ्या मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. मयत तुकाराम हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला असल्याचे कळते. या आपघातात चार  जण जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये सचिन  रंगनाथ  पवार , बालु  देविदास  राठोड,  
नामदेव महादेव  राठोड  रा. धारावती तांडा  आणि आमिर  नजीर  शेख रा.  मांडवा यांचा समावेश आहे. जखमींना अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या आपघाताची भिषणता येवढी आहे की दोन्ही मोटार सायकलचा संपूर्ण चकणाचुर झाल्याचे दिसून येत आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *