👁 7 Views

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन…. आमदार भारतनाना भालके यांच्या तारांकित प्रश्‍नांना मंत्री महोदयांनी दिली लेखी उत्तरे..!


पंढरपूर Live 22 December 2017
पंढरपूर ः दि.22 – महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन 2017 नागपूर येथे चालू असून सदर अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांनी खालील प्रमाणे तारांकित प्रश्‍न उपस्थित केले त्यावर संबंधित मा.मंत्री महोदयांनी लेखी उत्तरे दिली.
तारांकित प्रश्‍न- 1) पावसाळी हंगामामध्ये दि.5 ते 14 ऑक्टोबर, 2017 या कालावधीमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता, त्यानुसार शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागासह सर्व विभागांना देण्यात आलेल्या होत्या. 2) खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरी पध्दतीच्या बंधार्‍यांना टाकलेले दरवाजे काढणे गरजेचे होते, परंतु याच कालावधीत अतिवृष्टी होवून भिमा नदी पात्रामध्ये सुमारे 40000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला यामध्ये पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, आव्हे येथील को.प.बंधार्‍याचे दरवाजे काढण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंधार्‍यावरून पाणी वाहून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जावून ऊसासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 3) त्याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे का?
यावर जलसंपदा मंत्री मा.ना.श्री गिरीष महाजन साहेब यांनी लेखी उत्तर दिले की, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग शासन निर्णय दि.14/08/2015 अन्वये को.प.बंधार्‍यांना बर्गे बसविणेची कार्यवाही ऑगस्ट पासून सुरू करण्यात येते. दि.8 ते 9 ऑक्टोबर 2017 दरम्यान 3.5 मी.ऊंचीचे बर्गे बसविणेत आले होते. दि.10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान उजनी धरण व वीर पूर्ण क्षमतेने भरलेले असतांना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने उजनी व वीर धरणातून पूर नियंत्रणासाठी विसर्ग सोडणे क्रमप्राप्त होते. दोन्ही धरणातून 29837 ते 33437 क्युसेक्स इतका एकूण विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे बर्गे काढणे शक्य झाले नाही. तसेच बर्गे टाकण्याची कार्यवाही शासन धोरणाशी सुसंगत अशी आहे. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. व पिराची कुरोली येथील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणेत आले आहेत.
तारांकित प्रश्‍न- 2) राज्यात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत सोनोग्राङ्गी केंद्रांना नोंदणी करणे बंधनकारक असतांना 74 सोनोग्राङ्गी केंद्रांनी नोंदणीच केली नाही. 2) याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? 3) सदरहू सोनोग्राङ्गी केंद्रांवर कारवाई करून केंद्र बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? विलंबाची कारणे काय आहेत?
यावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री मा.ना.डॉ.श्री दिपक सावंत साहेब यांनी लेखी उत्तर दिले की, दि.22 सप्टेंबर, 2017 अखेर एकूण 76 सोनोग्राङ्गी केंद्रांनी नोंदणी केली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. दि.22 सप्टेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीतील नोंदणी नसलेल्या 76 केंद्रांविरूध्द मा.न्यायालयामध्ये प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 49 प्रकरणांचा निकाल लागलेला असून त्यापैकी 20 जणांना शिक्षा झालेली आहे आणि 27 प्रकरणे प्रलंबित आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *