👁 7 Views

नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रेस प्रारंभ

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
===================
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
======================
पुरातन सूर्यनारायण मंदिरास आकर्षक रोशणाई 


पंढरपूर Live 23 December 2017


पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत असणाºया सूर्यनारायण देव यात्रेस प्रारंभ झाला असून  ही यात्रा १९ डिसेंबर ते २४ जानेवारी म्हणजे पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शु. रथसप्तमीपर्यंत यात्राकालावधी राहणार आहे. पंढरपूर मोहोळ मार्गावर पंढरपूरपासून अवघ्या दहा किलोमी. अंतरावर सूर्यनारायणाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराचे बांधकाम अत्यंत दुर्मीळ, कोरीव नक्षीकाम असलेले मंदिर आहे. मंदिराची मूर्ती साडेपाच फूट उंच असून महादेवाच्या पिंडीवरती अखंड उभी आहे. श्रीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस लक्ष्मी व शेषदेवतांचे तर डाव्या बाजूस पद्मावती, चामरधारिणी. मूर्तीच्या प्रभावळीवरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. 

या यात्राकालावधीत मंदिरामध्ये दररोज पहाटे काकडा आरती, धुपारती, शेजारती, तसेच या कालावधीत भजन, कीर्तन, प्रवचन तसेच भारूडाचे आदींचे आयोजन केले जाते. पौष महिन्यातील तिसºया रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले जाते; अशी माहिती मंदिराचे पुजारी गणेश आवताडे यांनी दिली आहे. 
या यात्रेची सालाबादप्रमाणे याहीवर्षी जय्यत तयारी केली असून मंदिर आकर्षक रंगवून मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. या यात्रेस येणाºया भाविकांसाठी नारायण चिंचोली ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सूर्यनारायण देव ट्रस्ट, विविध संघटनांच्या वतीने गावामध्ये येणाºया भाविकांना स्वच्छतेसह शुद्ध पिण्याचे पाणी, वाहनतळ, दर रविवारी महाप्रसादाचे आयोजन आदी सोयी-सुविधा संघटितपणे पुरविल्या जाणार आहेत. अशी माहिती कृ.उ.बा. समितीचे मा.उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, सरपंच अलका माने, अध्यक्ष गहिनीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष विजय कोळेकर यांनी दिली.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *