👁 6 Views

पार पब्लिकेशन तर्फे कादंबरी व कविता संग्रहाचे प्रकाशन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 26 December 2017

पार    पब्लिकेशन   तर्फे      प्रसाद  कुमठेकर  लिखित  ”बारकुल्या  बारकुल्या  ष्टोर्या” या
कादंबरीचे आणि  महेश  लिलापंडित  लिखित  ”चष्मांतरे” या  कवितासंग्रहाचा    प्रकाशन 
ज्येष्ठ चरित्रकर वीणा गवाणकर, डॉ. आशुतोष  पाटील , गणेश  वसईकर , प्रा.विवेक  
कुडू  आणि  वर्जेश  सोलंकि  ह्यांच्या हस्ते   वि वा कॉलेज ,विरार येथे संपन्न झालेल्या
प्रकाशन सोहळ्यात करण्यात आले . यावेळी नाटककार ,कथालेखक जयंत पवार यांच्या
मनोगताचे कवी   इग्नेशियस  डायस  ह्यांनी वाचन केले .जयंत  पवार आपल्या
मनोगतात म्हणाले की चष्मांतरे आणि  बारकुल्या  बारकुल्या  ष्टोऱ्या हि दोन्ही पुस्तके
आजची आहेत आणि आजच्या संदर्भात महत्त्वाची आहेत .सध्याच्या सत्यमेव जयते हे
जपलेलं ब्रीद कोसळून बघताना आपण पाहत  आहोत या काळात नाकासमोर जगणाऱ्या
माणसाची होणारी गोची ,त्यांच्या शोकांतिका होताना पाहणाऱ्यांची होणारी गाची आणि
बदलेले जगण्याचे निकष/नॉर्म्स महेश  लिलापंडित आणि प्रसाद  कुमठेकर ह्या दोन
लिहित्या युवकांनी  त्यांच्या अनवट शैलीत शब्दबद्ध केले आहेत .    

यावेळी बोलताना प्रा.विवेक  कुडू यांनी बारकुल्या  बारकुल्या  ष्टोऱ्या या कादंबरीचे मर्म उलगडून सांगितले
. कादंबरीत अगदी वेगळ्या शैलीत लिहिलेले उदगीर ,उदगीरे आणि बोली या
प्रकरणामुळे कादंबरी अतिशय वाचनीय झाले आहे .या प्रकरणामुळे आणि बोलीतील
शब्दाची अर्थसुची दिल्यामुळे आशयाची दारे किलकिले झाली  आहेत .या कादंबरीत
अमुक एक नायक  नाही अनेक ननायक हि कादंबरी घडवितात ,यात भाष्य नाही असले
तरी ते अल्पाक्षरी आहे यात गावचर्चा आहे ,गावाचं मन आहे. जीवनातील असंबद्धता
कांदबरीचा फॉर्म झाला आहे.गावातील माणसे ,त्यांच्या बोली त्यांच्या लाईक ,सर्जक
,डॉक्युमेंट्री म्हणजे प्रसादची बारकुल्या  बारकुल्या  ष्टोऱ्या हि कादंबरी आहे.
बगळा नंतर इतक्या लवकर दुसरं पाऊल इतकं दमदार टाकलं याचा आनंद वाटतो
हे नमूद करून सांगितलं की बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या ही कादंबरी म्हणजे
बोलीचा समर्थ आविष्कार आहे. हि  कादंबरी म्हणजे उदगीर गावाचं चरित्र आहे गावची
परिस्थिती हीच हा कादंबरीचा नायक आहे . ह्या परिस्थीचे लेखकाने  केलेले निरीक्षण
,आणि त्याचे लेखकाला झालेले आकलन बारकाईने नोंदवत लेखकाचा कॅमेरा नुसता
दर्शन करवत नाही तर गावाच्या एकूण जगण्यात तळ गाठतो , यातील भाषिक आणि

गोष्ट सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे वाचक या कादंबरीच्या अधिक जवळ
पोहोचतो . असे विवेचन  जेष्ठ चरित्रकार  वीणा गवाणकर यांनी केले .
                      तसेच    महेश  लिलापंडित  लिखित  ”चष्मांतरे” या  कवितासंग्रहावर
बोलताना कवी  गणेश वसईकर म्हणाले कि महेशची कविता हि भाषेविषयी कमालीची
आस्था व्यक्त करते . वर्तमानात जगताना माणसाची होणारी दमछाक ,नातेसंबंधातील
कुरूपता व स्वतःविषयी वाटणारा संशय ,माणसाचा होत असलेला संकोच ,अभिव्यक्ती
स्वातंत्त्र्याचं दबलेपन हि कविता प्रकट करते . डॉ . आशुतोष पाटील म्हणाले
,"समकाळातील औपचारिक पण मुळात ढोंगी, दिखाऊ अशा मानवी जीवनव्यवहाराचा
सामना कसा करावा याने अस्वस्थ असलेले हे कविमन आशय, अभिव्यक्ती आणि
त्यांच्या मुळाशी असणारी भाषा अशा सगळ्याच स्तरांवरून तिरसटपणे व्यक्त होते.
माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा सांभाळू पाहणारे हे कविमन संवेदना-
विचारांपासून स्वत:ला दूर नेऊन जगू शकत नाही. त्यामुळेच वैयक्तिक ते सामाजिक
अशा सर्व स्तरांवरून  गोची झालेल्या समकालीन माणसाचे म्हणणे अगदी त्याच्या
मराठी – इंग्लिश शब्दांच्या संमिश्रणातून अभिव्यक्त करणारी ही रचना आहे".
कवी फेलिक्स डिसोजा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शैलेश साळवी यांनी
पाहुण्यांचे स्वागत केले
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *