पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 31 December 2017
निलेश चाळक बीड : गुन्हेगारीमुळे काळवंडलेली जिल्ह्याची प्रतिमा सरत्या वर्षातही बदलली नाही. पन्नासपेक्षा अधिक खून, साठहून अधिक बलात्कार अन् तेवढेच अपघाती बळी गेले आहेत. चोऱ्या – घरफोड्यांचा आकडाही थक्क करणारा आहे. एकूणच सरते वर्ष खून, अपघात व घरफोड्यांसारख्या घटनांनी गाजले. नवीन वर्षात गुन्हेगारांवर अंकुश ठेवत कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलीस दलापुढे आहे.
जिल्ह्यात सरत्या वर्षात ५३ खून, ६३ बलात्कार झाले. यात दोन सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. २० दरोडे, ७०४ चोऱ्या, ६१ जबरी चोऱ्या, २१२ विनयभंगाचे गुन्हे नोंद आहेत. खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांनी शंभरी गाठली आहे. फसवणुकीतही जिल्हा मागे नाही. सुमारे ८६ गुन्ह्यांची पोलीस दफ्तरी नोंद आहे. ३३ नववाहितांनी आत्महत्या केल्या असून ४१ जणांनी वेगवेगळ्या कारणावरुन आपले जीवन संपवले आहे. आर्म अॅक्टअन्वये १७ कारवाया झाल्या असून घातक शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जुगाराचे १३१९ तर अवैध दारु विक्रीचे २७६१ गुन्हे नोंद झाले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. ५२ कर्मचाºयांवर हल्ले झाले असून खाकी वर्दीही सुरक्षित नाही. वर्षभरात २१ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. अपघाताच्या घटनांनीही जिल्हा चर्चेत राहिला. सुमारे ६१ जणांचा यात बळी गेला. आष्टी तालुक्यात ट्रॅव्हल्स अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. हा सर्वांत मोठा अपघात ठरला. गेवराई तालुक्यात घाडगे दाम्पत्याची हत्या व दरोडा या घटनेने जिल्हा हादरून गेला. मात्र नंतर यातील आरोपीना पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले.
(ही आकडेवारी जोनवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंतची आहे)
आॅल आऊट आॅपरेशनचा धसका
जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’ ही नाविण्यपूर्ण मोहीम राबवली. अचानक संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरवून वाहनांची झाडाझडती घेण्यात येते. विशेष म्हणजे अधीक्षक श्रीधर यांच्यासह इतर उच्चपदस्थ अधिकारी या मोहिमेत स्वत: उतरत असून गुन्हेगारी वर्तुळाला हादरे दिले जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
५ टोळ्यांवर मोक्का; १३ जणांवर एमपीडीएचा बडगा
एकीकडे गुन्हेगारीचा आलेख वाढत असताना दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धडक कारवायांची मोहीमही सुरुच ठेवली. जिल्ह्यात वर्षभरात ५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. सोबतच १३ टोळ्यांवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) अन्वये गुन्हेगारांची रवानगी थेट कारागृहात केली. यात दोन वाळूमाफियांचा समावेश असून काही राजकीय पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे.
१५ पोलीस ठाणे आयएसओ
जिल्ह्यात सरत्या वर्षात परळीमध्ये संभाजीनगर या नवीन ठाण्याची निर्मिती करण्यात आली. सोबतच १५ पोलीस ठाणे आयएसओ मानांकित करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत ठाणेप्रमुखांना गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात अद्ययावत लॅब उघडण्यात आली. त्याचे उद्घाटन पार पडले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या प्रयत्नातून अधीक्षक कार्यालयाची आयएसओ मानांकडे वाटचाल सुरु आहे. अधीक्षक कार्यालयाचे रुपडे बदलले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था केली असून पोलीस वसाहतीमध्येही रस्ते, नाल्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
४३ लोकसेवक ‘एसीबी’च्या सापळ्यात
सरत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायाही चांगल्याच गाजल्या. एकूण ४३ लोकसेवक सापळ्यात अडकले. मात्र, फिफ्टी करता आली नाही. श्क्षिणासारखे पवित्र क्षेत्रही लाचेला अपवाद ठरले नाहीत. शिवाय खाकी वर्दीही लाचखोरीने डागाळली गेली. महसूल, जिल्हा परिषद अन् मत्स्य विकास कार्यालयावर एसीबीची वक्रदृष्टी पडली.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे





