पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आमलात आणण्याची गरज -सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे
स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८७ वी जयंती साजरी.
पंढरपूर–‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. आपण किती वेळ अभ्यास करतो ? यापेक्षा केलेला अभ्यास किती लक्षात राहतो. हे महत्वाचे आहे. असे केल्यास परिश्रमातून महिला प्रशासकीय सेवेत देखील आपले स्वतंत्र स्थान निर्माण करू शकतील.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे
गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेतून आय.पी.एस. झालेले पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘शिक्षण हे समाजाला जागे करण्याचे साधन असून, स्त्रियांना त्याची जास्त आवश्यकता आहे. हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. मुलींना शिकविण्याचे महान कार्य सावित्रीबाईंनी त्यागबुद्धीने व नि:स्वार्थ सेवाभावाने केले. सावित्रीबाईंनी केलेल्या कार्यामुळे आज भारतीय स्त्रीने सर्व क्षेत्रांत मानाचे स्थान पटकाविले आहे. स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय कार्याचा आदर्श घेवून शिक्षणातून विद्यार्थ्यांवर अधिक संस्कार घडणे गरजेचे आहे. स्त्रीने शिक्षणासोबत आत्मविश्वास अंगी बाळगून जीवनात खंबीरपणाने मुकाबला करावा.’ असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षक–पालक संघाचे अध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या खडतर जीवन कार्यावर प्रकाश टाकले.पुढे बोलताना सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, ‘ मी जिथे जिथे जाईन त्या त्या ठिकाणी स्वेरीच्या शिस्तीचे नाव निघेल. येथील शिस्त आणि संस्कार प्रत्येक महाविद्यालयात असावे.’ असे सांगून मुलींना म्हणाले की, ‘जिथे तुम्हाला सुरक्षेची भीती वाटते तिथे पोलिसांना हाक द्या. रोडरोमियोकडून जाणवणारा त्रास, छेडछाड या बाबींकडे दुर्लक्ष न करता आपल्या प्राध्यापकांना, पालकांना याची कल्पना द्या. त्याचा आम्ही बंदोबस्त करू. तसेच येथील शिक्षण पद्धत अत्यंत चांगले असून स्पर्धा परीक्षेचा बाऊ न करता आपण परिश्रमावर भर दिल्यास आय.पी. एस. परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड नाही. तसेच या ठिकाणी प्रारंभी १६ मुली पासून सुरु झालेले स्वेरीच्या या मुलींच्या वसतिगृहात आता महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या एक हजार पेक्षा जास्त मुली राहतात,म्हणजेच याचा अर्थ असा की पालकांनी डॉ. रोंगे सरांच्या सिस्टीमवर दाखवलेला हा विश्वास आहे.’ असे सांगून युपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेचे स्वरूप सविस्तर सांगितले. यावेळी टीसीएस, इन्फोसेस व एपिक रिसर्च या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचा सत्कार देखील पाहुण्यांकडून करण्यात आले. यावेळी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, वसतिगृहाचे व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा. यशपाल खेडकर, अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील १००० विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाली माने यांनी केले तर गायत्री शिंदे यांनी आभार मानले.
___________________________
आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
=====================
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे






