पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
सिरसदेवीमध्ये मायलेकीच्या कुंटणखान्यावर छापा
निलेश चाळक बीड : तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथे एका घरावर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालविणाऱ्या मायलेकीला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने केली.
पीडित १६ वर्षीय मुलगी बीडची रहिवासी आहे. तिला चांगले काम देते आणि सांभाळते असा बहाणा करून शारदा मच्छिंद्र चांदणे व सुनीता उर्फ नेहा मच्छिंद्र चांदणे या माय -लेकींनीकाही दिवसांपूर्वी सिरसदेवी फाटा येथे आणले होते. शरद चांदणे ही स्वतःच्या घरी फोनवरून ग्राहकांना बोलावून सदर अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होती. याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास प्राप्त झाली होती. सदरील माहितीच्या आधारे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि फौजदार दीपाली गित्ते यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या समवेत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सिरसदेवी फाटा येथील शारदा चांदणे हिच्या घरावर छापा मारला.
यावेळी ग्राहक आढळून आले नाहीत. पीडित मुलीची सुटका केली असून माय-लेकीवर फौजदार गित्ते यांच्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ८, १२, १७ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपास निरीक्षक अनिलकुमार जाधव करत आहेत
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


