👁 7 Views

ग्रामीण भागातील पत्रकारांनी बदलत्या प्रवाहात शामिल होणे अवश्यक-एस. एम. देशमुख

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018

निलेश चाळक| बीड 
 ग्रामीण भागातील पत्रकारांनी  पत्रकारिता करत असतांना नवनविन बदल आत्मसात करत पत्रकारितेत सुधार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले ते दिंद्रुड येथील संजिवनी फंक्शन हाॅल येथे दर्पण दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
दर्पण दिना निमित्त येथिल पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे,परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे,अधिस्विकृती सदस्य अनिल वाघमारे,दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सय्यद आसिफ,सरपंच अतुल ठोंबरे, भगवान कांदे, विठ्ठल गवळी,उपसरपंच नानासाहेब ठोंबरे, अतुल चव्हाण, बळीराम डापकर,पत्रकार बालाप्रसाद जाजु, हनुमान बडे, सुर्यकांत बडे, यांची प्रमुख उपस्थिति होती. गुलाब पुष्प देवुन सर्व उपस्थितांचे पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
मराठी तील पहिले नियत कालिक 6 जानेवारी 1832 साली दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु करुन पत्रकारितेचा पाया रचला होता. त्यामुळे 6 जानेवारी दर्पण दिन म्हणुन साजरा केला जातो.
सांसदीय, न्याय व प्रशासन प्रणाली या तिन स्तंभावर वर लक्ष  ठेवणाऱ्या पत्रकारिता या चाैथ्या स्तंभावर भारतीय व्यवस्था चालते. ती मजबूत करण्याचे काम खऱ्या अर्थाने पत्रकारिता क्षेत्र करत असल्याचे मत  एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले. 
       पत्रकारांच्या आरोग्याबाबत आपण सदैव जागृत असुन पत्रकारांसाठी मंत्रालयातील माझा कक्ष सदैव उघडा असल्याचे दर्पण दिनाच्या शुभेच्छा देत ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. येथिल पत्रकार बंडुजी खांडेकर यांना पत्रकार आरोग्य सहाय्यक बीड जिल्हा तर पत्रकार संतोष स्वामी यांना मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मिडीया राज्य कार्यकारणीत समाविष्ट केल्या बद्दल येथिल पत्रकारांनी ॠण व्यक्त केले. मोहन जगताप मित्र मंडळ, बालाजी चालक मालक संघटना व सिरसाळा पत्रकार संघाच्या वतीने एस.एम. देशमुख व ओमप्रकाश शेटे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रस्तावीक बंडुजी खांडेकर यांनी तर सुत्रसंचलन शिरीषकुमार रामदासी व आभार प्रकाश काशिद यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संतोष स्वामी, अमोल ठोंबरे,बाबा देशमाने, कैलास शिंदे,नागेश वकरे,भागवत साबळे,गणेश काटकर, काशिनाथ खांडेकर,सुनिल खाडे यांनी परिश्रम घेतले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *