👁 8 Views

वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ तरुणानं घेतला पदवी परत करण्याचा निर्णय..!

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018

वाढत्या बेरोजगारीची समस्या सोडविण्यात सरकारला अपयश आल्याचे सांगत वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ  गितेवाडी, ता. पाटोदा, जि.बीड येथील चांगदेव गौतम गिते या पदवीधारक युवकाने औषध निर्माण शास्त्रातील त्यानं मिळवलेली पदवी परत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन या तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. खालील व्हिडीओत बघा या तरुणाचं मनोगत.





तरुणांच्या हाताला काम द्या अन्यथा बेरोजगारी भत्ता चालू करा – चांगदेव गिते निलेश चाळक बीड -राज्यात आज घडीला लाखो विद्यार्थी बेरोजगार आहेत. अन सरकार या तरुणांच्या हाताला काम देण्यास अपयशी ठरत असून या बाबीचा निषेध म्हणून मी माझी फार्मसी ची पदवी वापस करू इच्छित आहे . तरुणांच्या हाताला काम द्या अन्यथा बेरोजगारी भत्ता सरकारने चालू करावा , शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे . आज घडीला फार्मसी , अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षण घेऊन ही लाखो विध्यार्थी बेरोजगार आहेत. सरकारच्या विविध विभागात कित्येक वर्षांपासून जागा भरल्या जात नाहीत. यामुळे बहुसंख्य विध्यार्थी व्यसनाधीनता , गुन्हेगारी या मार्गावर जात आहेत व अनेक जन आपली जीवन यात्रा देखील संपवत आहेत. आज भारत जगातील सर्वात तरुण देश आहे परंतु सरकार या तरुणांच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यात अपयशी ठरत असून याची येणाऱ्या काळात आपल्या देशाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे . आज घडीला राज्यात एका जागेसाठी लाखो बेरोजगार अर्ज करत आहेत. एकतर शिक्षणाला जीवनातील महत्वाचा वेळ अन पैसा खर्च झाल्याने तरुणाना इतर क्षेत्रात शिरकाव करणे अवघड जात आहे . नौकरी नसल्याकारणाने अनेक तरुणांचे विवाह देखील जुळणे अवघड बनत चालले आहे . सरकारने चालू केलेल्या मुद्रा लोन साठी बँका टाळाटाळ करत आहेत . अलीकडच्या काळात जवळपास पाच हजार छोटे-मोठे यद्योग बंद झाले असून सरकाने रोजगाराच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत. शाहू , फुले , आंबेडकर सारख्या महापुरुषांनी आपलं जीवन खर्च करून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात-देशात शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली परंतु अलीकडच्या काळात काही शिक्षण सम्राटांनी ती मेढ खिळखिळी करण्याचे काम चालवले आहे अश्या शिक्षण सम्राटांची दुकानदारी मोडीत काढून मार्केट मध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार करावे .
अन तरुणांना दर्जेदार शिक्षण व हाताला काम मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती आहे.


मुख्यमंत्र्यांना दिलेलं हे निवेदन 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *