पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018
राष्ट्रीय मतदार दिनी
विविध उपक्रमांचे आयोजन
सोलापूर दि.10 :- भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने 25 जानेवारी 2018 रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी सकाळी 8.30 वाजता चार पुतळा येथून निघणार असून फेरी आंबेडकर पुतळा – सिध्देश्वर प्रशाला मार्गे श्री छत्रपती रंगभवन येथे जाणार आहे. मतदार दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या फेरीत शहरातील महाविद्यालयातील एन.सी.सी, एन.एस.एस, चे विद्यार्थी महानगरपालिका व अन्य शाळामधील सुमारे 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस.व्ही.धुमाळ यांनी दिली आहे.
मतदार जनजागृतीसाठी चित्ररथही फेरीत समाविष्ट असणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिनांक 1 जानेवारी 2018 अर्हता दिनांकावर आधारित पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून जिल्ह्यात 30,242 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 32,32,064 इतकी झाली आहे.
दिनांक 25 जानेवारी 2018 रोजी रंगभवन येथे सकाळी मतदार दिनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मा. भारत निवडणूक आयोगाचा संदेश प्रसारित करून उपस्थितांना एकात्मतेची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदारांचा दिनांक 01.01.2000 रोजी जन्म झालेला आहे, त्यांचा सहस्त्रक मतदार म्हणून मतदान नोंदणी मोहीम कालावधीत ज्या अंध, अपंगांची नोंदणी झालेली आहे, त्यांचा सत्कार आणि मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना व नागरीकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस.व्ही.धुमाळ यांनी कळविले आहे.
*****
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


