👁 9 Views

क.भा.पा. महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाला संपन्न

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे 
एक दिवसीय रयत इन्स्पायर कार्यशाळा संपन्न’
पंढरपूर: दि.-११/0१/२०१८ रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव
पाटील महाविद्यालय व रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये सुरु असलेले ‘रयत इन्स्पायर
प्रकल्पामध्ये एक दिवसीय कार्यशाळेची मंगळवार दि. ०९/०१/२०१८ रोजी
सांगता झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन इटली हून आलेले संशोधक मा. डॉ.
सुशीलकुमार जाधव यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यर्थ्याना नॅनो टेकनॉलोजी विषयी
मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.
सीताराम गोसावी उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयांच्याविज्ञान शाखेच्या पदवीस्तरावरील रयत इन्स्पायर प्रकल्पामधील
४५ विध्यार्थी व १० प्राध्यापक सहभागी झाले होते.
उद्घाटनानंतरशालेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विविध विज्ञानशाखेस
भेट दिली. यावेळी विद्यार्थ्याना भूगोल विभागामध्ये संशोधनामध्ये वापरल्या
जाणाऱ्या सर्व उपकरणांनची माहिती घेतली व हाताळून पाहीली. या मध्ये
चंर्दावरील खड्डे पाह्ण्यासाठी वापरली जाणारी दुर्बीण पाहीली तसेच पर्यावरनाशी
निगडीत मोजमाप करणारे विविध उपकरणे पाहीली. रसायनशास्त्र या विभागा
मध्ये विद्यार्थ्यानावेगवेगळ्या पदार्थाचा सामूतपासणे, पाण्याचे शुद्धीकरण करणे,
तापमानाच्या नोंदी घेणे, कॅलशिअम कारबोनेट तयार होण्याची प्रक्रियाअभ्यासने
तसेच विभागामधील सामुमापक, वर्तनुक मीटर, स्पेक्ट्रोफोटोमीटर याउपकरनांची
माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यानी प्राणीशास्त्र विभागामध्ये विविध प्रकारचे जतन
केलेले प्राणी यामध्ये प्रामुख्याने दुर्मिळ असे खवल्या मांजर, लोरीसव त्याबरोबर
विविध प्रकारचे पक्षी व साप पाहीले या मध्ये एकॉलोजी मध्ये वारली जाणार्या
वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देण्यात आली. याचवेळी प्राण्यांवर आधारित अनेक
लघुपट दाखवण्यात आले.
दुपार सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र या
विभागस भेट दिली. यावेळी विद्यार्थ्याना उती संवर्धन करण्याची प्रक्रिया व
लागणारी उपकरणे, जीवाश्म, ओषधी वनस्पती, सामू मापक, सिटीफुज, ओव्हन,
इतर उपकरणे दाखवण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स या विभगामध्ये
विद्यार्थ्यानालघुपटाद्वारे विषयाचे महत्व पटवून दिले. तसेच विविध इलेक्ट्रॉनिक
उपकरनांची जोडणी व उपयोग सांगण्यात आले.
तद्नन्तर विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या भव्य अशा ग्रंथालयास भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध विषयांचे संदर्भग्रंथ, अनेक दुर्मिळ
पुस्तके, एनसायक्लोपीडिया, विविध प्रकारचे शब्दकोश, मासिके, जगातील शास्त्रज्ञ
व त्याचे शोध, भारतीतील प्रमुख दहा हिल स्टेशन यावरीललघुपट व
ग्रंथालयातील उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा दाखविण्यात आल्या. दुपार
सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानास भेट दिली, या
उद्यानात असलेल्या सर्व वनस्पती विषयी माहिती दिली तसेच याठिकाणी
असणाऱ्या शेवाल वर्गीय वनस्पती व गप्पी माशांचे महत्व पटवून सांगितले.
याचबरोबर रोपवाटिकेतील कार्यपद्धती दाखविण्यात आली. महाविद्यालयामध्ये
कार्यरत असलेले गांडूळ खत प्रकल्प व पावसाचे पाणी साठविण्याची पद्धती
दाखविण्यात आली.
या रयत इन्स्पायर महोत्सव समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मवीर भाऊराव
पाटील महाविद्यालयाचे मा. प्राचार्य गोसावी एस. एन. होते व प्रमुख उपस्थित प्रा.
पाटील जे. एस, तंटक सर व तोडकरी सर होते. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले
विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्रक व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा
सत्कार करण्यात आला. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रयत इन्स्पायर
प्रकल्पामधील प्रा. डॉ. लोखंडे सर, प्रा. डॉ. पिसे एन. एम., प्रा.डॉ. अमोल पाटील,
प्रा.देडे. ए.एन. प्रा. चव्हाण एस. जि., प्रा. भगत सर, प्रा. डॉ. ममल्लया सर, प्रा.
पाटील मॅडम, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
समारोप प्रसंगी कार्यक्रमाचागोषवारा रयत इन्स्पायर प्रकल्प प्रमुख प्रा. डॉ.
नवनाथ पिसे यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. अमोल पाटील
यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा. कु. आर.आर.हिलाल यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *